हनी सिंह याने केले किंग खानचे काैतुक, टिका करणाऱ्यांची बोलती बंद, म्हणाला शाहरुख खान हा…

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. पठाण चित्रपटाने तूफान कामगिरी केलीये. आता यावर भाष्य रॅपर हनी सिंह याने केले आहे. हनी सिंह याने शाहरुख खान याचे काैतुक केले, याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हनी सिंह याने केले किंग खानचे काैतुक, टिका करणाऱ्यांची बोलती बंद, म्हणाला शाहरुख खान हा...
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 9:07 PM

मुंबई : सुपरस्टार आणि बाॅलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. कारण या चित्रपटाने आता पर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट (Movie) रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. त्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान हा परत बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करणार की नाही हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.

कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट सतत फ्लाॅप जात होते. साऊथचे चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत होते. आता बाॅलिवूडची हवा कमी झाली असून साऊथच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळले असल्याचे अनेकांनी म्हटले. कारण या दरम्यान आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेले.

फक्त आमिर आणि अक्षय यांचेच चित्रपट नाही तर अनेक बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप गेल्याने बाॅलिवूडचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान अनेकांनी शाहरुख खान याचे आता काहीही होऊ शकत नसल्याचे देखील म्हटले होते. मात्र, पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच 100 कोटीची कमाई करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान याच्यावर अनेकांनी टिका केली होती. मात्र, तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना उत्तरे दिली आहेत. आता यावर रॅपर हनी सिंह याने देखील मोठे भाष्य केले आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

हनी सिंह म्हणाला की, लोक म्हणत होते की शाहरुख खान हा संपला आहे…शाहरुख खान संपला… त्याचा हा देखील चित्रपट चालणार नाही… अगोदरच्या चित्रपटांप्रमाणे…, आता त्याने बँड वाजवला…पुढे हनी सिंह याला विचारण्यात आले की, तू शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बघितला का? यावर हनी सिंह म्हणाला की, आतापर्यंत मी शाहरुख खान याचा चित्रपट बघितला नाहीये.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने धमाका केला. सर्व वादाचा चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसून आले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.