चार मांजरी, मिनी कूपर गाडी, महागडी ज्वेलरी, जॅकलिन फर्नांडीस सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात अडकली तरी कशी?

एकीकडे बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez), तर दुसरीकडे 200 कोटींचा चुना लावणारा सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar), दोघांची जोडी एकमेकांसाठी बनलीये असं अजिबातच वाटत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुकेश आणि जॅकलिनच्या नावाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

चार मांजरी, मिनी कूपर गाडी, महागडी ज्वेलरी, जॅकलिन फर्नांडीस सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात अडकली तरी कशी?
Jacquline-Sukesh
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 12:26 PM

मुंबई : एकीकडे बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez), तर दुसरीकडे 200 कोटींचा चुना लावणारा सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar), दोघांची जोडी एकमेकांसाठी बनलीये असं अजिबातच वाटत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुकेश आणि जॅकलिनच्या नावाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

मागील काही महिन्यांनपूर्वी जॅकलिन प्रेमात पडली असून, ती लवकरच आपल्या श्रीमंत व्यवसायिक प्रियकरासोबत समुद्र किनाऱ्यावरच्या एका सुंदर बंगल्यात राहायला जाणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, त्याच्या काही महिन्यानंतरच तिच्या बॉयफ्रेंड तिहार तुरुंगात दिसला, तर जॅकलिन पैशांची घोटाळेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरी जात आहे.

त्या पहिल्या वेळी…

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021च्या दरम्यान सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडीसला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी जॅकलिन फर्नांडीसने त्याला अजिबात भाव दिला नाही. अशावेळी सुकेशने एक शक्कल लढवली आणि आपला नंबर गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑफिस नंबरशी बदलत तिच्या एका जवळच्या व्यक्तीला संपर्क केला.

त्याने जॅकलिनचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिल याला फोन केला. जॅकलिन फर्नांडीसचे सोशल मीडिया अकाऊंट पहिले तर लक्षात येईल की शान आणि तिची फार छान मैत्री आहे. एका जवळची मैत्रीण या नात्याने शानने तिला या फोनबद्दल सांगितले. हा व्हीआयपी नंबर असणारा व्यक्ती जॅकलिनशी बोलू इच्छितो हे देखील त्याने तिला सांगितले.

त्यांना वाटले की हा खरच एखादा व्हीआयपी नंबर आहे, कारण पलीकडून बोलणारा व्यक्ती थेट गृहमंत्रालयाचा हवाला देत होता आणि नाव सांगत होता ‘शेखर रत्न वेला’. यानंतर, जॅकलिन फर्नांडीस आणि सुकेश यांच्यामध्ये बातचीत सुरु झाली. दोघांच्या गप्पा वाढू लागल्या, दरम्यान सुकेशने आणखी काही थापा मारल्या. यात त्याने आपण सन टीव्हीचे मालक तसेच जयललिता यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले.

राजकुमारीसारखी वागणूक!

जसजशी या दोघांची जवळीक वाढली तसतसे तो तिला महागड्या भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. या भेटवस्तूंची किंमत चक्क कोटींमध्ये होती. रिपोर्ट्स नुसार सुकेशने सात कोटी रुपयांच्या भेटवस्तू जॅकलिन फर्नांडीसला दिल्या.

यात बिर्किनी बॅग, चॅनेल, गुची, YSLचे कपडे, हर्मीस-टीफिनी ब्रेसलेट, महागड्या अंगठ्या आणि कानातले यांचा समावेश होता. इतकंच नाही तर, रोलेक्स, फ्रँक मूलरची घड्याळं यांनीही तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला गेला. नवी कोरी मिनी कूपर देऊन तिला आणखी भुरळ पाडण्यात आली. केवळ जॅकलिन फर्नांडीसच नाहीतर, तिच्या परिवाराचीही बडदास्त ठेवण्यात आली. यात तिच्या कुटुंबातील सदस्यांना पोर्श आणि मासेराती कार भेट म्हणून मिळाल्या. तिच्या बहिणीला अमेरिकेत 1 लाख 80 हजार डॉलरची मदत केली गेली. तर, ऑस्ट्रेलियातील भावाला 50 हजार डॉलर दिले गेले. जॅकलिनला मांजरी आवडतात कळल्यावर तिला चक्क चार महागड्या मांजरी दिल्या गेल्या.

कसा बनला श्रीमंत?

जर तुम्ही श्रीमंतीत जन्माला आला नसाल तर, तुम्ही श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करू शकता. मात्र, चुकीच्या प्रयत्नांमुळे सुकेश थेट तुरुंगात गेला. मात्र, तो इथेही शांत बसला नाही, इथे त्याने एक नवं साम्राज्य तयार केलं. आयडिया तीच, वसुलीची, आणि त्याला आपला शिकारही मिळाला. शिकार होते रॅनबॅक्सीचे माझी प्रमोटर शिविंदर सिंह. ते देखील अशाच काही प्रकरणामुळे तुरुंगात होते. त्यांना तुरुंगातून बाहेर पडायचे होते, तर त्यांच्या पत्नीला त्यांना घरी पहायचे होते. याच परिस्थितीचा फायदा सुकेशने उचलला.

15जूनला सुकेशने शिविंदर यांची पत्नी आदितीला फोन केला. स्वतःला सरकारी अधिकारी म्हणवत आपण त्यांना तुरुंगातून बाहेर काढू, असे आश्वासन दिले. व्हॉईस मॉड्युलेशनचा वापर करून तो प्रत्येक वेळी वेगवेगळे हुद्दे सांगायचा. तीन वेळा फोन केल्यानंतर अखेर त्याने पैशांचा विषय काढला. पतीला बाहेर काढण्याच्या आशेने आदितीने 200 कोटी देऊ केले. मात्र, पुढे काहीही घडलं नाही.

तुरुंग सुकेशचे दुसरे घर!

नशीब नेहमीच साथ देईल, असे नाही. तुरुंगातून बाहेर पडताच त्याने जॅकलिन आणि नोरावर भेटवस्तूंची उधळण करण्यास सुरुवात केली. एकीकडे तो अभिनेत्रींशी जवळीक वाढवत होता, तर दुसरीकडे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आणि ईडीची चौकशी सुरु झाली.

वयाच्या 17व्या वर्षी त्याने लोकांना ‘चुना’ लावण्यास सुरुवात केली. आता तो 32 वर्षांचा आहे. तुरुंग त्यांच्यासाठी नवी गोष्ट नाही. मागच्या वेळी त्याने 25-30 कोटी खर्च करून संपूर्ण बॅरेक घेतली होती. तुरुंगातील काही अधिकाऱ्यांना लाच देऊन सुकेशने हे कारनामे केले होते. मात्र, आता जॅकलिन देखील यात अडकली आहे. 20 ऑक्टोबर रोजी जॅकलिन आणि सुकेश यांची चौकशी करण्यात आली.

प्रश्न : तुमचे नाव सांगा.

जॅकलिन : माझे नाव जॅकलिन फर्नांडीस आहे.

सुकेश : माझे नाव सुकेश चंद्रशेखर आहे.

प्रश्न : तुम्ही कधी एकमेकांना भेटलात? बोललात?

जॅकलिन : हो. आम्ही फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 दरम्यान फोनवर बोललो आणि जून महिन्यात चेन्नईमध्ये दोनवेळा भेटलो.

सुकेश : हो. आम्ही फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 दरम्यान फोनवर बोललो आणि जून महिन्यात चेन्नईमध्ये दोनवेळा भेटलो.

प्रश्न : जॅकलिनसमोर ओळख काय सांगितली?

जॅकलिन : त्याने स्वतःला सन टीव्हीचा मालक शेखर रत्न वेला आणि जयललिता यांचा नातेवाईक असे सांगितले.

सुकेश : मी माझी ओळख शेखर अशीच सांगितली.

प्रश्न : पहिल्यांदा कधी बोललात?

जॅकलिन : जानेवारी 2021

सुकेश : डिसेंबर 2020

प्रश्न : जॅकलिनच्या बहिणीसाठी गाडी खरेदी केली?

जॅकलिन : नाही.

सुकेश : आठवत नाही.

प्रश्न : जॅकलिनच्या बहरीन स्थित कुटुंबासाठी गाडी खरेदी केली?

जॅकलिन : नाही.

सुकेश : आठवत नाही.

प्रश्न : जॅकलिनच्या बहिणीला किती पैसे दिले?

जॅकलिन : 15,00000 अमेरिकन डॉलर

सुकेश : आठवत नाही

प्रश्न : जॅकलिनच्या भावाला किती पैसे दिले?

जॅकलिन : 15 लाख

सुकेश  : आठवत नाही

प्रश्न : एकमेकांशी कसे बोलायचात?

जॅकलिन : What’s App कॉल आणि व्हिडीओ कॉल

सुकेश :  What’s App कॉल

प्रश्न : एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या का?

जॅकलिन : हो.

सुकेश : मला आठवत नाही.

प्रश्न : जॅकलिनच्या वतीने अद्वैत कालाला 15 लाख दिले का?

जॅकलिन : हो.

सुकेश : हो.

समुद्र किनारी बंगला खरेदी करण्याचे स्वप्न ते सतत ईडीच्या चौकशीचा ससेमिरा यात अडकलेली जॅकलिन मात्र आता बेजार झाली असणार, हे नक्की!

हेही वाचा :

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.