Video | स्टारडमकडे दुर्लक्ष करत भाईजानला विमानतळावर रोखलं, सोशल मीडियावर सीआयएसएफ अधिकाऱ्याचे होतेय कौतुक! पाहा व्हिडीओ
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या नवीन चित्रपट 'टायगर 3' च्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला आहे. रशियाला जाण्यापूर्वी त्याला सीआयएसएफ जवानाने मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या नवीन चित्रपट ‘टायगर 3’ च्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला आहे. रशियाला जाण्यापूर्वी त्याला सीआयएसएफ जवानाने मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सीआयएसएफ जवानाचे कौतुक करत आहेत, ज्यांनी स्टारडमकडे दुर्लक्ष करत सलमानला सुरक्षा तपासणीसाठी गेटवर थांबवले.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर टिप्पणी करताना एका वापरकर्त्याने लिहिले, “सीआयएसएफ जवानाने सलमानला ज्या प्रकारे रोखले ते पाहून मला आनंद झाला.’ दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘CISF जवान देखील स्टारसारखा दिसतोय.’ एका युजरने लिहिले, ‘मी सलमान खानचा चाहता नाही. मला CISF जवानाने सलमान खानला असे थांबवणे आवडले. मी त्याला कर्तव्य केल्याबद्दल सलाम करतो.’ त्याचवेळी दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘मला माझ्या सैनिकांचा अभिमान आहे.’
नेमकं काय झालं?
वास्तविक, सीआयएसएफ अधिकाऱ्याने सलमानला मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले. त्याचा एक व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सीआयएसएफ अधिकाऱ्याचे कौतुक केले जात आहे. हा जवान सलमानच्या स्टारडमच्या प्रभावाखाली आला नाही आणि त्याला सामान्य नागरिकासारखी वागणूक दिली. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, सलमानचे चाहते त्याचे विमानतळावर स्वागत करत आहेत आणि फोटोग्राफर त्याचे फोटो काढत आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये ‘दबंग’ सलमान खान ब्लू डेनिम्स आणि ब्लॅक टी-शर्टसह लाल शूजमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान विमानतळाच्या गेटमधून आत जायला निघाला, तेव्हा तेथे उपस्थित सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्याला सुरक्षा तपासणीसाठी थांबवले आणि तपासणी केल्यानंतर सलमान खानने गेटच्या आत प्रवेश घेतला.
व्हिडिओमध्ये सलमान खान शांत आणि हळू हळू टीमसोबत पुढे जाताना दिसत आहे.फो टोग्राफर्सनी त्याला पोज देण्याची विनंती केली, तेव्हा सलमानने त्याचा मास्क काढून त्यांच्यासाठी फोटो पोज दिल्या.
‘टायगर 3’च्या शूटसाठी रवाना
असे सांगितले जात आहे की, सलमान खान रशियामध्ये सुमारे 2 महिने ‘टायगर 3’ चे शूटिंग करणार आहे. या आधी सलमान खानचे एकाच नावाचे दोन चित्रपट झाले आहेत. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. इमरान हाश्मी या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
सलमान ‘टायगर-3’ चे शुटींग पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात परत येईल. कारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ‘बिग बॉस’ टीव्हीवर प्रदर्शित होईल, जो सलमान होस्ट करणार आहे. त्याची डिजिटल आवृत्ती सध्या करण जोहर होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त, सलमान महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :
‘मला चार लोकांचे आभार मानायचे आहेत’, करण बूलानीची लग्नानंतर रियासाठी खास पोस्ट
तो बाहुला अन् ती बाहुली, जुळतील का दोघांच्या रेशीमगाठी? पाहा नव्या मालिकेचं नवं शीर्षक गीत