The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियात दमदार कमाई, तब्बल इतके कलेक्शन
द केरळ स्टोरी हा चित्रपट सतत चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर थेट चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. आता चित्रपटाला बरेच दिवस रिलीज होऊन झाले असताना देखील चित्रपटाचा वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.
मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मुळात म्हणजे चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. एकीकडे विरोध तर दुसरीकडे बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कमाई चित्रपटाची बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने आतापर्यंत 90 कोटींपेक्षाही अधिक कमाई केलीये. अजूनही चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस (Box office) कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
भारतामध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मेलाच रिलीज झाला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आलीये. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारच्या विरोधात चित्रपट निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतलीये.
नुकताच 12 मे रोजी द केरळ स्टोरी हा चित्रपट 37 देशांमध्ये रिलीज झालाय. विशेष म्हणजे विदेशात देखील प्रेक्षकांचे मोठे प्रेम हे द केरळ स्टोरी चित्रपटाला बघायला मिळत आहे. धमाकेदार कमाई करताना द केरळ स्टोरी चित्रपट दिसत आहे. नुकताच द केरळ स्टोरी चित्रपटाचे विदेशातील बाॅक्स आॅफिस कलेक्शन तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.
#TheKeralaStory commences Weekend 2 with A BANG… Hits DOUBLE DIGITS on [second] Fri… Will cross ₹ ? cr mark TODAY [second Sat]… Will emerge SECOND HIGHEST GROSSING #Hindi film [of 2023] in *Week 2* itself… [Week 2] Fri 12.23 cr. Total: ₹ 93.37 cr. #India biz. #Boxoffice… pic.twitter.com/lta7dfnFOE
— taran adarsh (@taran_adarsh) May 13, 2023
ऑस्ट्रेलिया दणदणीत कमाई करताना द केरळ स्टोरी हा चित्रपट दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये द केरळ स्टोरी चित्रपटाने ओपनिंग डेलाच तब्बल 44.76 लाखांचे कलेक्शन केले आहे. पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातल्याने कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही 17 मे रोजी पार पडणार आहे.
वादाचा फायदा हा द केरळ स्टोरी चित्रपटाला झाल्याचे दिसत आहे. कारण द केरळ स्टोरी चित्रपट धमाकेदार कामगिरी करत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले जात आहे.