Sonu Sood | आयकर विभाग अधिकारी पुन्हा सोनू सूदच्या घरी, आधीही 20 तास झाडाझडती
बुधवारी (15 सप्टेंबर) आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदशी (Sonu Sood) संबंधित त्याच्या सहा ठिकाणांवर एक सर्वेक्षण केले. वास्तविक, या सर्वेक्षणाद्वारे, आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : बुधवारी (15 सप्टेंबर) आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदशी (Sonu Sood) संबंधित त्याच्या सहा ठिकाणांवर एक सर्वेक्षण केले. वास्तविक, या सर्वेक्षणाद्वारे, आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आज (16 सप्टेंबर) पुन्हा आयकर विभागाचे अधिकारी अभिनेत्याच्या घरी पोहोचले आहेत.
बातमीनुसार, आयकर अधिकारी गुरुवारी पुन्हा सोनू सूदच्या घरी पोहोचले आहेत. तर, बुधवारी अधिकारी तब्बल 20 तासांच्या सर्वेक्षणानंतर निघून गेले होते. पण, आज पुन्हा अधिकारी येथे पोहोचले आहेत.
आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर पाहणी करण्यास सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
Income Tax survey underway at actor Sonu Sood’s residence. Visuals from outside his building in Mumbai pic.twitter.com/cMKkRJ39S5
— ANI (@ANI) September 16, 2021
आयकर विभागाला हिशोबात गडबडीची शंका
हा छापा नाही, किंवा आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. बातमीनुसार, आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिनी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. पण, आज ज्या प्रकारे अधिकारी पुन्हा अभिनेत्याच्या घरी पोहोचले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, हे प्रकरण काही मोठे रूप धारण करणार आहे.
गरिबांचा मसिहा
गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागले तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद याने स्वखर्चाने या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.
सोनूची संपत्ती किती?
caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते.
सोनू आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1996मध्ये लग्न केले.
घर, हॉटेल आणि कॅफेचा मालक!
सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.
गाड्यांचीही आवड
सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.
हेही वाचा :
मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानचा जॅकी श्रॉफच्या बायकोशी काय वाद होता?