Russia-Ukraine Conflict: पुतीनवर भडकली सलमानची गर्लफ्रेंड; म्हणाली..
युक्रेन आणि रशियातील संर्घष (Russia Ukraine Conflict) शिगेला पोहोचला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
युक्रेन आणि रशियातील संर्घष (Russia Ukraine Conflict) शिगेला पोहोचला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. रशिया-युक्रेन संघर्षावर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतातील अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनीदेखील सोशल मीडियाद्वारे ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशी भूमिका मांडली. सेलिब्रिटींकडून विविध पोस्ट आणि व्हिडीओद्वारे आवाहन करण्यात येत आहे. अशातच बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर (Iulia Vantur) हिने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यावर राग व्यक्त केला आहे. लुलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर याबाबत पोस्ट लिहिले आहेत.
लुलियाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये एक रशियन व्यक्ती हातात फलक घेऊन असल्याचं पहायला मिळत आहे. ‘मी रशियन आहे आणि मला माफ करा’, अशा आशयाचा मजकूर त्या फलकावर लिहिलेला आहे. हा फोटो शेअर करत लुलियाने लिहिलं, ‘अत्यंत वाईट व्यक्ती, जुलमी आणि युद्ध गुन्हेगार पुतीन हे रशियाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. रशियन लोकांना दोष देऊ नका.’ याशिवाय तिने आणखी एका पोस्टमध्ये युक्रेनचं समर्थन केलं आहे. ‘युद्ध कोणाची बाजू घेत नाही. युद्धात फक्त जीवितहानी होते. युद्धात आपला जीव गमावलेल्या निष्पाप लोकांसाठी मला खूप वाईट वाटतंय. मी फक्त माणुसकीच्या बाजूने आहे’, असं तिने लिहिलं आहे.
दरम्यान रशियाच्या युद्धखोरीचा निषेध करत युक्रेनच्या समर्थनार्थ रविवारी बर्लिनमध्ये झालेल्या आंदोलनात सुमार एक लाख नागरिक सहभागी झाले होते. तर दुसरीकडे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी अण्वस्त्र दलाला सतर्क राहण्याचे आदेश रविवारी दिले. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुले आपण हे आदेश दिल्याचं समर्थनही पुतीन यांनी केलं.
संबंधित बातम्या: रशिया-युक्रेन वादाच्या भारताला संघर्षझळा, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ महत्वाचं पाऊल