नोरा फतेही हिने जॅकलिन फर्नांडिसवर केलेल्या गंभीर आरोपावर अभिनेत्रीच्या वकिलाने दिले उत्तर
आता नोराच्या आरोपांवर जॅकलिन फर्नांडिस हिच्या वकिलाने प्रतिक्रिया दिलीये.
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात आता वेगळे वळण आले असून बाॅलिवूडच्या दोन अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत. इतकेच नव्हे तर आता थेट नोरा फतेही हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट मानहानीचा दावा दाखल केलाय. फक्त जॅकलिन फर्नांडिसच नव्हे तर यासोबतच नोराने काही मीडिया कंपन्यांविरोधात ही मानदानीचा दावा दाखल केलाय. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आपला काहीच संबंध नसताना नाव बदनाम केले जात असल्याचे नोराने म्हटले आहे. आता नोराच्या आरोपांवर जॅकलिन फर्नांडिस हिच्या वकिलाने प्रतिक्रिया दिलीये.
जॅकलिन फर्नांडिस हिचे वकिल प्रशांत पाटील म्हणाले की, माझ्या क्लाइंटने कधीच नोरा फतेही हिच्यावर सार्वजनिकपणे टीका किंवा कोणते आरोप केले नाहीयेत. इतकेच नाहीतर ईडी कारवाईवर कधीच माझ्या क्लाइंटने भाष्य केले नाहीये.
नोहा फतेहीने कोणत्याही कारवाईच्या अगोदरच प्रकरणाची प्रत लीक केली आहे, ज्यामुळे तिच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. यामुळे आम्ही पण नोरा फतेही विरोधात मानहानीची केस दाखल करू शकतो, असे प्रशांत पाटील म्हणाले आहेत.
नोरा फतेही हिचा काहीतरी गैरसमज झाल्याचे देखील प्रशांत पाटील म्हणाले आहेत. नोरा फतेही याचिकेत म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखरचा आणि माझा काहीच संबंध नाही, तरीपण या प्रकरणात सातत्याने माझे नाव जोडले जात आहे.
मी सुकेशकडून कोणतेही गिफ्ट देखील घेतले नाही. फक्त माझी बदनामी केली जात आहे. नोरा फतेही हिने याचिकेमध्ये म्हटले आहे की, जॅकलीन फर्नांडिस ही करिअरमध्ये माझी स्पर्धा करू शकत नसल्याने अशी बदमानी करत आहे.