Janhvi kapoor | श्रीदेवी यांच्यासाठी जान्हवी कपूर हिने शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाली आई आजही मी तुला सर्वत्र…

जान्हवी कपूर हिच्या या पोस्टवर बाॅलिवूडच्या अनेक स्टारने कमेंट केल्या आहेत. आथिया शेट्टी, वरुण शर्मा, करण जोहर, मनीष मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह यांनी कमेंट केल्या आहेत.

Janhvi kapoor | श्रीदेवी यांच्यासाठी जान्हवी कपूर हिने शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाली आई आजही मी तुला सर्वत्र...
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 3:34 PM

मुंबई : श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेऊन आता पाच वर्ष उलटले आहेत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये श्रीदेवी (Sridevi) यांचा मृत्यू झाला. एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी त्या दुबईमध्ये पोहचल्या होत्या. नुकताच जान्हवी कपूर हिने आईच्या आठवणीमध्ये एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जान्हवी कपूर (Janhvi kapoor) हिने तिच्या आईसोबतचा एका खास फोटोही शेअर केलाय. जान्हवी कपूर हिने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केलीये. जान्हवी कपूर हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आई मी तुला आजही सर्वत्र शोधते…जान्हवी कपूर हिची हा पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिने म्हटले की, मम्मा मी अजूनही तुला सगळीकडे शोधत आहे… सध्या मी ते सर्व करते आहे ज्याचा तुला अभिमान वाटेल…मी जे काही करते त्याची सुरूवात तुझ्यापासून करते आणि शेवटीही…आता जान्हवी कपूर हिच्या या पोस्टमध्ये अनेकांनी कमेंट केल्या आहेत. चाहतेही जान्हवी कपूर हिची पोस्ट वाचून भावनिक झाले आहेत.

जान्हवी कपूर हिच्या या पोस्टवर बाॅलिवूडच्या अनेक स्टारने कमेंट केल्या आहेत. आथिया शेट्टी, वरुण शर्मा, करण जोहर, मनीष मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह यांनी कमेंट केल्या आहेत. यासोबत बोनी कपूर यांनीही श्रीदेवी यांच्या आठवणीमध्ये भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या चित्रपटाचे जान्हवी कपूर हिने जोरदार प्रमोशनही केले. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

मिली या चित्रपटाची निर्मिती स्वत: बोनी कपूर यांनी केली होती. जान्हवी कपूर हिच्या मिली या चित्रपटासोबतच सोनाक्षी सिन्हा हिचा डबल XL आणि कतरिना कैफ हिचा फोन भूत रिलीज झाले होते. हे तिन्ही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले.

काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, जान्हवी कपूर ही साऊथच्या एका चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावर बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, सध्याच जान्हवी कपूर ही साऊथमध्ये डेब्यू करणार नाहीये किंवा तिच्याकडे कोणत्याही साऊथच्या चित्रपटाची आॅफर नाहीये.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.