Kangana Ranaut | कंगना राणावत RRR च्या दिग्दर्शकासाठी मैदानात, थेट ट्रोलर्सला सुनावले खडेबोल, म्हणाले हे सहन…

आता परत एकदा कंगना राणावत ही चर्चेत आलीये. RRR ला वादग्रस्त म्हटल्यानंतर कंगना राणावत संतापली आहे. कंगना राणावत यावेळी चक्क साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे समर्थन करताना दिसली आहे.

Kangana Ranaut | कंगना राणावत RRR च्या दिग्दर्शकासाठी मैदानात, थेट ट्रोलर्सला सुनावले खडेबोल, म्हणाले हे सहन...
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 6:32 PM

मुंबई : कंगना राणावत आणि वाद हे समिकरण गेल्या काही वर्षांपासून बघायला मिळत आहे. कंगना राणावत कायमच तिच्या विधानांमुळे चर्चेत येते. विषय कोणत्याही असो कंगना आपले मत मांडताना अजिबात विचार करत नाही. २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी कंगना राणावत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. काही वर्षे कंगना फक्त इंस्टाग्रामवर होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच ट्विटरकडून तिचे अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. वादग्रस्त ट्विट केल्यामुळे तिचे अकाउंट सस्पेंड आले होते. ट्विटर पुनरागमन केल्यानंतर तिने ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूडमधील (Bollywood) काही लोक असतात. काही दिवसांपूर्वी तिने एक ट्विट करत नाव न घेता रणबीर कपूर याच्याविरोधात ट्विट केले होते. इतकेच नाही तर माझ्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे देखील कंगनाने म्हटले होते. आपला व्हॉट्सअ‍ॅप डेटा लीक होत असल्याचे कंगनाने म्हटले. सर्वत्र पठाण चित्रपटाचे काैतुक होत असतानाच कंगनाने पठाण चित्रपटाच्याविरोधातही एक पोस्ट शेअर केली होती.

आता परत एकदा कंगना राणावत ही चर्चेत आलीये. RRR ला वादग्रस्त म्हटल्यानंतर कंगना राणावत संतापली आहे. कंगना राणावत यावेळी चक्क साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे समर्थन करताना दिसली आहे. कंगना राणावत हिने एसएस राजामौली यांना सपोर्ट केल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

एसएस राजामौली यांनी नुकताच The New York ला एक मुलाखत दिली आहे. यामुळेच सध्या एसएस राजामौली हे प्रचंड चर्चेत आले आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी धर्म आणि हिंदू धर्मग्रंथांवर खुलेपणाने आपले काही विचार मांडले आहेत. मात्र, अनेकांच्या पचनी एसएस राजामौली यांचे विचार पडले नाही.

एसएस राजामौली म्हणाले की, एक काळ माझ्या आयुष्यात असा होता जेव्हा मी खूप जास्त धार्मिक होते. परंतू मी आताही नास्तिक अजिबात नाहीये. ही मुलाखत प्रकाशित करते वेळी त्यांना (The Man Behind Indias Controversial Global Blockbuster RRR) म्हटले गेले. यावर कंगना राणावत म्हणाली की, राजामौलीसोबत वाद हा शब्द वापरणे अजिबात आवडले नाही.

यावर कंगनाने काही ट्विट शेअर केले. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, या देशावर प्रेम करण्यासाठी आणि प्रादेशिक चित्रपट जगासमोर नेण्यासाठी त्यांनी कोणते वाद केले हे मला माहीत आहे, ते देशासाठी समर्पित आहेत, ही त्यांची चूक आहे म्हणूनच ते त्यांना वादग्रस्त म्हणतात. हे अजिबात सहन केले जाणार नसल्याचे देखील कंगनाने म्हटले. आता कंगनाचे हे ट्विट व्हायरल होताना दिसत आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.