Kangana Ranaut | या व्यक्तीची काॅपी गेल्याचा आरोप करत कंगना राणावत हिने थेट फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला फटकारले
इतके नाही तर आयुष्यामध्ये आपण कशाप्रकारचा संघर्ष केलाय हे देखील तिने यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी तिने बाॅलिवूडच्या (Bollywood) एका अभिनेत्याविरोधात एक ट्विट केले होते. आता कंगना तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आलीये.
मुंबई : बाॅलिवूड क्वीन कंगना राणावत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाउंट 24 जानेवारीपासून पुन्हा एकदा सुरू झाले. म्हणजेच कंगना राणावत हिने दोन वर्षांनंतर ट्विटरवर कम बॅक केले आहे. आता कंगना राणावत ही ट्विटरवर चांगलीच सक्रिय झाली असून कंगना राणावत परत एकदा अॅक्शन मोडवर आलेली दिसत आहे. कंगना राणावत गेल्या दोन वर्षांपासून इंस्टाग्रामवर सक्रिय होती. मात्र, आता परत एकदा ट्विटर अकाउंट सुरू झाल्याने तिने आपला मोर्चा आता ट्विटर वळवला आहे. दररोज काहींना काही पोस्ट कंगना राणावत ही ट्विटर (Twitter) करताना दिसते. आजच कंगनाने #askangana नावाने सेशन आयोजित केले. यावेळी तिने आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना बिनधास्तपणे उत्तरे दिली आहेत. यावेळी तिने बाॅलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्याची खिल्लीही उडवली. इतके नाही तर आयुष्यामध्ये आपण कशाप्रकारचा संघर्ष केलाय हे देखील तिने यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी तिने बाॅलिवूडच्या (Bollywood) एका अभिनेत्याविरोधात एक ट्विट केले होते. आता कंगना तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आलीये.
आता कंगना राणावत हिच्या निशाण्यावर थेट फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. कंगना राणावत हिने थेट मार्क झुकरबर्ग यांच्यावर काॅपी केल्याचा आरोप केला आहे. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
ट्विटरचे सूत्र हाती घेतल्यानंतर एलन मस्क यांनी पेड ब्लू टिक सेवा सुरू केली. त्यानंतर आता फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही असाच एक निर्णय घेतला आहे. त्यांनी Meta Verified ची घोषणा केली, वापरकर्ते पैसे देऊन ब्लू टिक मिळवू शकतात. ही सेवा अगोदर दोन देशांमध्ये सुरू होणार आणि मग इतर सर्व देशांमध्ये.
Mark verifying with Government id!!! Kangana said the same earlier !! Her x rays are real !!! She is always ahead!!! https://t.co/pK79C3uSYt
— VAIBHAV (@BhaktWine) February 19, 2023
मार्क झुकरबर्ग यांच्या याच निर्णयावर कंगना राणावत भडकली आहे. तिने थेट मार्क झुकरबर्ग यांच्यावर काॅपी केल्याचा आरोप केला आहे. मार्क झुकरबर्गच्या पोस्टवर एका युजर्सने कमेंट केली. त्यावर कंगना राणावत हिने लिहिले की, हा… हा…एलन मस्क यांनी हे करण्यासाठी संपूर्ण जगाशी लढा दिला.
पुढे कंगनाने लिहिले, सर्वांनी एलन मस्कवर टिका केली. लोकांनी ट्विटर सोडण्याच्या धमक्याही दिल्या. त्याने सर्व सेवा देखील आणल्या नाहीत आणि त्याची कल्पना इतकी मोठी हिट आहे की लोकांनी आधीच त्याची कल्पना हायजॅक करून कॉपी केली. आता कंगनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.