AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | हृतिक रोशन आणि दिलजीत दोसांझ यांची खिल्ली कंगना राणावत हिने उडवली, थेट म्हणाली…

अत्यंत कमी वयामध्ये घरातून पळून येत कंगना राणावत हिने मुंबई गाठली होती. त्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली. कंगना राणावत कायमच तिच्या बिनधास्त बोलण्यामुळे चर्चेत राहते.

Kangana Ranaut | हृतिक रोशन आणि दिलजीत दोसांझ यांची खिल्ली कंगना राणावत हिने उडवली, थेट म्हणाली...
| Updated on: Feb 20, 2023 | 6:25 PM
Share

मुंबई : कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच अखेर दोन वर्षांनंतर ट्विटरवर कम बॅक केले आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. 2021 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळीच कंगना राणावत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत कंगना राणावत हिने आपण ट्विटर परत आल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर आता कंगना राणावत ही ट्विटरवर चांगलीच सक्रिय झाली असून आपल्या चित्रपटांच्या पोस्ट आणि विविध विषयावर मत ट्विटरवरून मांडते आहे. नुकताच कंगना राणावत हिने #askangana नावाने सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये कंगना राणावत हिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यामध्ये तिने आपल्या जुन्या दिवसांची देखील आठवण काढत आपण कोणत्या त्रासामधून गेलो हे देखील सांगितले. अत्यंत कमी वयामध्ये घरातून पळून येत कंगना राणावत हिने मुंबई गाठली होती. त्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली. कंगना राणावत कायमच तिच्या बिनधास्त बोलण्यामुळे चर्चेत राहते.

या सेशनच्या वेळी एका चाहत्याने कंगना राणावत हिला विचारले की, तुमचा आवडता अभिनेता कोण आहे? यासोबतच दोन ऑप्शन देण्यात आले. यामध्ये हृतिक रोशन आणि दिलजीत दोसांझ यांचे नाव होते. यावर कंगना राणावत हिने अत्यंत धाकड उत्तर दिले आहे.

कंगना राणावत हिने या प्रश्नाला जे उत्तर दिले ते आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे. कंगना म्हणाली की, मला वाटते की यापैकी कोणी अॅक्शन करतो तर कोणी गाण्याचा व्हिडिओ तयार करतो. खरोखरच सांगायचे झाले तर मी यांच्यापैकी एकालाही कधी अभिनय करताना बघितलेच नाहीये.

ज्यावेळी मी यांच्यापैकी एकाचा अभिनय पाहिल त्यादिवशी मी यावर उत्तर देऊ शकते. आता कंगना राणावत हिचे हेच उत्तर व्हायरल होताना दिसत आहे. म्हणजे तिने हृतिक रोशन याला आपण कधी अभिनय करताना बघितले नसल्याचे म्हटले आहे. तिने म्हटले की, यापैकी एकजण अॅक्शन करतो आणि दुसरा गाण्याचे व्हिडीओ तयार करतो.

कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांचा वाद सर्वांनाच माहिती आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिने हृतिक रोशन याच्यावर गंभीर आरोप केले होते. या सेशनमध्ये कंगना राणावत हिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे देताना कंगना राणावत दिसली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.