Kangana Ranaut | कंगना रनौतच्या याचिकेवर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295A आणि 153A या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या याचिकेवर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 10:34 AM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295A आणि 153A या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. या खटल्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. 8 जानेवारीला कंगना रनौतने वांद्रे पोलिस स्टेशन गाठले होते आणि तिथे कंगनाने तिचा जवाब नोंदवला होता. पोलिस कंगनाचा हा जवाब आज न्यायालयातही सादर करू शकतात. मात्र, चाैकशी अद्याप पूर्ण झाली नाही यामुळे पोलिस कंगनाला परत एकदा चौकशीसाठी बोलू शकतात. (Kangana Ranaut’s petition to be heard in High Court today)

या अगोदरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने 8 जानेवारीपर्यंत कंगनाला अटक करू नये असे सांगितले होते. मात्र, कंगनाने पोलिसांना सहकार्य करावे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर कंगना 8 जानेवारीला वांद्रे पोलिस स्टेशनला पोहचली होती. तिथे कंगनाची सुमारे 3 तास चौकशी करण्यात आली. कंगनाच्या 100 हून अधिक ट्विटवर पोलिसांचे लक्ष आहे. पोलिसांना या सर्व ट्वीटची चौकशी करायची आहे. 8 जानेवारीला पोलिस फक्त 4-5 ट्वीटची चौकशी करू शकले होते.

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौत विरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. कंगना या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

संबंधित बातम्या : 

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस

(Kangana Ranaut’s petition to be heard in High Court today)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.