राज कुंद्रा प्रकरण ऐकून कंगना रनौत संतापली, म्हणाली ‘म्हणूनच मी संपूर्ण इंडस्ट्रीला गटार…’
राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडे, गहना वशिष्ठ यासारख्या लोकांच्या प्रतिक्रियेनंतर आता कंगना रनौत आता या प्रकरणावर बोलली आहे. या प्रकरणावरून कंगना चांगलीच संतापली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील फिल्म बनवण्यासाठी सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आता कोर्टाने राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजच्या तुरूंगात जाण्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतने (Kanagna Ranaut) यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे (Kangana Ranaut’s reaction on Raj Kundra obscene film case).
राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडे, गहना वशिष्ठ यासारख्या लोकांच्या प्रतिक्रियेनंतर आता कंगना रनौत आता या प्रकरणावर बोलली आहे. या प्रकरणावरून कंगना चांगलीच संतापली आहे.
काय म्हणाली कंगना रनौत?
अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीतून आपला मुद्दा मांडला आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘यामुळेच मी फिल्म इंडस्ट्रीला गटार म्हणते, जे काही चमकते ते सगळेच सोने नसते.’ कंगनाने पुढे लिहिले की, ‘मी माझ्या आगामी टीकू वेड्स शेरू चित्रपटात बॉलिवूडचा पर्दाफाश करणार आहे, आम्हाला उद्योगात दृढ विश्वास प्रणाली आणि कडकपणा हवा आहे.’
कंगनाच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया तीव्रपणे समोर येत आहेत. कंगना तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कंगना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि दररोज काही सेलिब्रिटींवर टीका करत असते. अशा परिस्थितीत आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कंगनाच्या निशाण्यावर आले आहेत.
काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.
(Kangana Ranaut’s reaction on Raj Kundra obscene film case)