लिव्ह इन रिलेशनशिपवर अभिनेत्री कनिष्का सोनीचा धक्कादायक खुलासा, माझी अवस्था श्रद्धासारखीच…
ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण याचा संताप व्यक्त करत आहे.
मुंबई : श्रद्धा आणि आफताबचे प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे. लिव्ह इनमध्ये श्रद्धा आफताबसोबत राहत होती. मात्र, आफताबने श्रद्धाचा खून केला. इतकेच नव्हे तर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले आणि एक एक करून दिल्लीतील जंगलात फेकून दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण याचा संताप व्यक्त करत आहे. बाॅलिवूड क्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
या घटनेनंतर आता एका टीव्ही अभिनेत्रीने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. इतकेच नाही तर ही अभिनेत्री स्वत: यासारख्या घटनेतून गेल्याचे तिने सांगितले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिया आैर बाती फेम कनिष्का सोनी ही आहे.
लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना आपला पार्टनर आपल्याला कसे मारत होता आणि लग्नाचा विषय काढल्यावर पुढे काय करायचा हे सर्व कनिष्काने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रडत रडत सांगितले. कनिष्काचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे लक्षात येईल की, कनिष्का किती जास्त त्रासामधून गेलीये.
कनिष्काने खुलासा केला की तिच्या जोडीदाराचीही आफताबसारखीच मानसिकता होती, ते दिवस तिच्यासाठी खूप जास्त कठीण होते. कनिष्का सोनी म्हणाली की, ‘मी श्रद्धाच्या स्टोरीशी स्वतःला जोडू शकते. मला आठवते की एका अभिनेत्याने मला प्रपोज केला होता आणि लग्न करण्याचे देखील वचन दिले होते.
मग मी त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये असताना त्याचा राग, हिंसक स्वभाव हे सर्व काही बघितले. मात्र, त्यावेळी मला असे वाटले की, लग्न झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल, एका रात्री मी लग्नाविषयी त्याला बोलले मग त्याने मला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. मी माझे काही साहित्य घेऊन तिथून पळून आले.