Kanta Laga Video : हनी सिंग, नेहा कक्कर आणि टोनी कक्करची ही त्रिकूट प्रेक्षकांवर दाखवणार जादू, नवीन गाण्याचं टीझर आऊट

नेहा कक्कर आणि टोनी कक्करनं हनी सिंगसोबत एक टीम किंवा वैयक्तिकरित्या काम केलं आहे. मात्र, या गाण्यात तीन कलाकार एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Kanta Laga Video : Honey Singh, Neha Kakkar and Tony Kakkar's trio will show magic to the audience, new song's teaser out)

Kanta Laga Video : हनी सिंग, नेहा कक्कर आणि टोनी कक्करची ही त्रिकूट प्रेक्षकांवर दाखवणार जादू, नवीन गाण्याचं टीझर आऊट
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 4:50 PM

मुंबई : नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि यो यो हनी सिंग (Honey Singh) यांच्या ‘कांटा लाग’ (Kanta Laga) या गाण्याचा टीझर आता रिलीज झाला आहे. हा टीझर 2 सप्टेंबरला रिलीज होणार होता, मात्र टीव्ही कलाकार सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमुळे या गाण्याच्या टीझरची तारीख पुढे ढकलण्यात आली. आज म्हणजेच रविवारी, हा टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपण नेहा कक्कर आणि हनी सिंगसोबतच टोनी कक्करलाही पाहू शकता. हनी सिंग, टोनी आणि नेहा कक्कर यांनी एकत्र हे गाणे सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कक्कर भाऊ -बहिनीनं अनेकदा हनी सिंगसोबत एक टीम किंवा वैयक्तिकरित्या काम केलं आहे. मात्र, या गाण्यात तीन कलाकार एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रॅकचे बोल टोनीनं लिहिले आहेत आणि त्यानं गाण्याला संगीत देखील दिलं आहे. व्हिडीओ मिहीर गुलाटी यांनी दिग्दर्शित केला आहे. सध्या, टीझरबद्दल बोलायचं झालं तर, ते खूप इन्टेंस दिसतोय. या टीझरमध्ये नेहा कक्कड पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे, या लूकमध्ये ती यापूर्वी कधीही दिसली नव्हती.

कधी रिलीज होणार हे गाणं?

हे गाणं एक डान्स नंबर आहे, जे कदाचित लोकांना आपल्या बिट्सवर नाचवू शकेल. नेहा आणि हनी सिंगचे चाहते या गाण्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. नेहा कक्कड, टोनी कक्कर आणि हनी सिंग यांनी त्यांच्या संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याची पोस्ट शेअर केली आहे. नेहा कक्करनं लिहिलं आहे – डान्स फ्लोरवर धडक मारण्यासाठी सज्ज व्हा.. हे गाणे 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रिलीज होईल …

पाहा टीझर

भारतीय संगीत इंडस्ट्रीतील सर्वात आवडते कलाकार या गाण्याद्वारे एकत्र येतील आणि त्यांची चमकदार जुगलबंदी सादर करतील. जेव्हाही हनी सिंग आणि नेहा कक्कर यांचे गाणे रिलीज होतं, तेव्हा ते म्युझिक चार्टवर पहिल्या क्रमांकावर राहतं. आता हे पाहावे लागेल की हनी सिंग, नेहा कक्कर आणि टोनी कक्करची ही त्रिकूट प्रेक्षकांवर कोणती जादू दाखवू शकते.

सध्या जर आपण हनी सिंगबद्दल बोललो तर तो कायद्याच्या अडचणीत अडकला आहेत. वास्तविक, हनी सिंगच्या पत्नीनं दिल्लीच्या तिस हजारी न्यायालयात त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत खटला दाखल केला आहे. या प्रकरणात हनी सिंग शुक्रवारी न्यायालयात हजरही झाला होता.

संबंधित बातम्या

KBC 13 : जुबिन नौटियाल थेट करोडपती बनलेल्या हिमानीच्या घरी, पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Rishi Kapoor’s Birthday : कपूर कुटुंबियांनी असा साजरा केला दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा वाढदिवस, शत्रुघ्न सिन्हांसह अनेक कलाकारांची हजेरी

Malaika Arora: स्टाईल में रहने का… डीप नेक मेटॅलिक ड्रेसमधला मलायकाचा ग्लॅमरस आवतार पाहाच

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.