बॉयकॉट ट्रेंड, ट्रोलिंग, बहिष्काराच्या धमक्यांवर करण जोहर याने केले मोठे वक्तव्य, ट्रोलर्स करणच्या निशाण्यावर
शाहरुख खान हा कुठल्या बाॅलिवूड चित्रपटामध्ये दिसणार की, नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला होता? शाहरुख खान याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जाते.
मुंबई : शाहरुख खान याने वयाच्या ५७ व्या वर्षी तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये धमाकेदार पध्दतीने पुनरागमन केले आहे. गेल्या चार वर्षांपासून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. कारण गेल्या चार वर्षांपासून शाहरुख खान हा बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर होता. परत शाहरुख खान हा कुठल्या बाॅलिवूड चित्रपटामध्ये दिसणार की, नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला होता? शाहरुख खान याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जाते. पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा शाहरुख खान याने दाखवून दिले आहे की, त्याला का बाॅलिवूडचा किंग म्हटले जाते. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स ऑफिसवर एका मागून एक फ्लाॅप जात होते. यामुळे बाॅलिवूडचे मोठे नुकसान (Damage) झाले. अनेकांनी या दरम्यान बाॅलिवूडला टार्गेट करत थेट बाॅलिवूडकडे चांगल्या स्टोरी नसल्याचेच म्हटले होते. अक्षय कुमार, आमिर खान आणि रणवीर सिंह या स्टारच्या चित्रपटांनी देखील बाॅक्स ऑफिसवर मार खाल्ला.
कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच दुसरीकडे साऊथचे चित्रपट रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी बाॅक्स ऑफिसवर करताना दिसत होते. यामुळे बाॅलिवूडमध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळत होते.
यादरम्यान बाॅलिवूडला अनेक पध्दतीने ट्रोल करण्यात आले. अनेकांनी बाॅलिवूडवर निशाना साधत स्टार किड्स अजून लाॅन्च करा…असे काही ताणे देखील सुनावले होते. स्टार किड्समुळेच बाॅलिवूडची वाट लागल्याचे अनेकांनी म्हटले.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाका करत सर्वांची बोलती नक्कीच बंद केलीये. २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज झालाय आणि फक्त चार दिवसांमध्ये या चित्रपटाने जगभरातून तब्बल ४०० कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले.
आता पठाण चित्रपटासंदर्भात बाॅलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर याने एक खास पोस्ट इंस्टा स्टोरीवर शेअर केलीये. या पोस्टमधून त्याने ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
करण जोहर याने लिहिले की, एका उत्तम चित्रपटापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही… चित्रपटाच्या जबरदस्त यशाने हे सिद्ध केले की अधिक प्रमोशन, ट्रोलिंग किंवा बहिष्काराच्या धमक्या देऊन चित्रपटाचे काहीही नुकसान होऊ शकत नाही.