एअरपोर्टवर करीनाची खेचली बॅग, केली धक्काबुक्की; Video आला समोर

करीनाच्या संयमाचं नेटकऱ्यांकडून कौतुक

एअरपोर्टवर करीनाची खेचली बॅग, केली धक्काबुक्की; Video आला समोर
Kareena KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 3:52 PM

मुंबई- आपल्या लाडक्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप आतूर असतात. सेलिब्रिटींसोबत एक फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी चाहते किती धडपड करतात हे अनेकदा व्हिडीओतून समोर आलं आहे. अनेकदा या सर्व गोष्टींचा त्रास सेलिब्रिटींना सहन करावा लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अभिनेत्री करीना कपूर खानसोबत (Kareena Kapoor Khan) एक सेल्फी (Selfie) काढण्यासाठी चाहत्यांनी तिच्याभोवती अक्षरश: गर्दी केली.

सोमवारी सकाळी करीनाला एअरपोर्टवर पाहिलं गेलं. आगामी चित्रपटासाठी ती लंडनला जात होती. एअरपोर्टवर ती जेव्हा गाडीबाहेर निघाली, तेव्हा चाहत्यांच्या गराड्याने तिला घेरलं. करीनासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. यादरम्यान काहींनी धक्काबुक्कीही केली. या सर्वांत करीनाला कम्फर्टेबल वाटत नव्हतं, हे स्पष्ट या व्हिडीओत पहायला मिळतंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

एका फोटोसाठी चाहत्यांनी तिची बॅगसुद्धा खेचली. तर सेल्फीसाठी एक चाहता बळजबरीने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पापाराझींनी हा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांच्या अशा कृत्याने घाबरलेली करीना यात पहायला मिळतेय.

चाहत्यांच्या गर्दीत अडकलेली असतानाही करीना अत्यंत संयमाने वागली. बॅग खेचल्याने किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याने ती त्यांच्यावर भडकली नाही. त्यांच्यासोबत तिने सेल्फी आणि फोटो काढले. तिच्या या स्वभावाचं कौतुक करत असतानाच नेटकऱ्यांनी चाहत्यांवर राग व्यक्त केला.

‘हे बरोबर नाही, कसं वागायचं हे चाहत्यांना समजलं पाहिजे’, अशी कमेंट एका युजरने केली. तर चाहत्यांनी आपली मर्यादा ओलांडू नये, असं दुसऱ्याने लिहिलं.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.