Confirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) लवकरच दुसर्‍यांदा पालक होणार आहेत.

Confirmed | मार्च महिन्यात नाही तर 'या' महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 1:13 PM

मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) लवकरच दुसर्‍यांदा पालक होणार आहेत. गेल्या वर्षी करिनाने तिच्या दुसर्‍या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. नुकताच एका मुलाखती दरम्यान सैफ अली खानने सांगितले आहे की, करिना फेब्रुवारीमध्ये आई होणार आहे आणि यासाठी तो खूप एक्साइटेड आहे. मात्र, सैफ अली खान आणि करिना कपूर खान त्यांच्या दुसऱ्या बाळाला लाइमलाइटपासून दुर ठेवणार आहे. कारण तैमूर नेहमी लाइमलाइटमध्ये असतो तैमूर जिकडे जातो तिकडे फोटोग्राफर पोहचतात. (Kareena Kapoor Khan will be a mother in February)

कधी कधी तो फोटोग्राफर चिडतो देखील यामुळे या दुसऱ्या बाळाला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याच्या निर्णय सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी घेतला आहे. करिना आठ महिन्यांची गर्भवती आहे. गरोदरपणातील अनेक फोटो करिनाचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिनाने गर्भावस्थेत फिट राहण्यासाठी योगा करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर धूमाकुळ घालत होते. मात्र, करिनाच्या या फोटोंना ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता.काही लोकांचे म्हणणे आहे की, आपल्या देशात 63 टक्के महिला प्रसूती होईपर्यंत काम करतात. मग यांनी योगा केला तर यात काय मोठी गोष्ट आहे. 2016 मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले होते. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. ‘प्रेगा न्यूज’ होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

MeToo | प्रिती झिंटाच्या 2 वर्षांपूर्वीच्या विधानाची सोना महापात्राकडून जोरदार खिल्ली!

Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम ‘सामना, कोण मारणार बाजी?

(Kareena Kapoor Khan will be a mother in February)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.