करीना कपूर हिने शेअर केला खास फोटो, तैमूर दिसला जिराफसोबत खेळताना, सैफ अली खानही…
बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायमच चर्चेत असते. चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ भेटला की, करीना कुटुंबियांसोबत चांगला वेळ कायमच घालवते. सध्या सैफ अली खान, करीना कपूर हे आफ्रिकेच्या टूरवर आहेत.
मुंबई : बॉलिवूडचे स्टार कपल म्हणून अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान यांच्याकडे बघितले जाते. करीना आणि सैफ अली खान यांची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त अशी आहे. कायमच करीना कपूर आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. करीना कपूर हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करत म्हटले होते की, मी सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक लोकांनी मला सैफ अली खान याच्यासोबत लग्न (Marriage) न करण्याचा सल्ला दिला होता. सैफ अली खान याचा घटस्फोट झाल्याने त्याच्याशी लग्न नको करू असे माझे जवळचे लोक म्हणत होते.
नुकताच करीना कपूर हिने इंस्टा स्टोरीवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सैफ अली खान, तैमूर अली खान आणि जेह अली खान दिसत आहेत. करीना कपूर सध्या फॅमिलीसोबत अफ्रिका येथे फिरण्यासाठी गेलीये. करीना कपूर हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सैफ अली खान हा कॅमेऱ्याकडे पाहून पोज देताना दिसत आहे.
या फोटोमध्ये सैफ अली खान यांच्यासोबत तैमूर आणि जेह देखील दिसत आहेत. मात्र, कॅमेऱ्याकडे यांचे अजिबात लक्ष नसून तैमूर आणि जेह हे जिराफकडे बघत आहेत. आता करीना कपूर हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
करीना कपूर हिला वेळ मिळाला की, ती फॅमिलीसोबत फिरताना दिसते. काही दिवसांपूर्वी करीना कपूर आणि आमिर खान यांचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
आमिर खान याला लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा होती, परंतू हा चित्रपट फ्लाॅप गेला. नुकताच आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग UK मधून करून करीना मुंबईमध्ये आली होती. आता ती फॅमिलीसोबत आफ्रिकेला सुट्टयांसाठी गेलीये. करीना कपूर हिने शेअर केलेला फोटो चाहत्यांना आवडताना दिसत आहे. या फोटोमध्ये तैमूर आणि जेह हे जिराफसोबत खेळताना दिसत आहेत.