Karisma Kapoor: ‘पुन्हा लग्न करशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर करिश्मा कपूरने दिलं उत्तर

करिश्माने (Karisma Kapoor) 2003 मध्ये व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 2014 मध्ये करिश्मा आणि संजयने घटस्फोटासाठी अर्ज केला. 2016 मध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते.

Karisma Kapoor: 'पुन्हा लग्न करशील का?'; चाहत्याच्या प्रश्नावर करिश्मा कपूरने दिलं उत्तर
Karisma Kapoor Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 1:22 PM

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा फोटो होता अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor). आलियाच्या हातातील कलीरा जेव्हा करिश्माच्या डोक्यावर पडला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद फोटोग्राफरने अचूक टिपला. नवविवाहित वधूच्या हातातील कलीरा जिच्या डोक्यावर पडतो, तेव्हा कुटुंबात पुढचं लग्न तिचंच होईल, असं मानलं जातं. आता करिश्माने याच प्रश्नाचं उत्तर एका चाहत्याला दिलं आहे. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान एका चाहत्याने करिश्माला तिच्या लग्नाबाबत (Marriage) प्रश्न विचारला. ‘तू पुन्हा लग्न करशील का’, असा प्रश्न विचारला असता त्यावर करिश्माने उत्तर दिलं आहे. यावेळी तिने तिचा आवडता पदार्थ कोणता, रणबीर कपूर आवडतो की रणवीर सिंह यांचंही उत्तर दिलं.

करिश्माने तिचा आवडता पदार्थ ‘बिर्याणी’ तर आवडता रंग काळा असल्याचं सांगितलं. रणबीर आणि रणवीरपैकी कोण आवडतं असं विचारल्यास ती दोघंही आवडत असल्याचं म्हणाली. एका चाहत्याने करिश्माला विचारलं, ‘तू पुन्हा लग्न करशील का’? त्यावर तिने संभ्रमात असल्याचं दर्शवणारा GIF व्हिडीओ पोस्ट केला आणि पुढे लिहिलं, ‘(व्यक्ती आणि परिस्थितीवर) अवलंबून असेल’. करिश्माने 2003 मध्ये व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 2014 मध्ये करिश्मा आणि संजयने घटस्फोटासाठी अर्ज केला. 2016 मध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते.

पहा फोटो-

करिश्माच्या घटस्फोटानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील रणधीर कपूर म्हणाले होते, “आम्ही कपूर आहोत आणि आम्हाला कोणच्याच पैशांमागे धावायची गरज नाही. आमच्याकडे पैसा आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी आहेत. संजय हा थर्ड क्लास व्यक्ती आहे. करिश्माचं त्याच्याशी लग्न व्हावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. त्याने त्याच्या पत्नीची कधीच काळजी घेतली नाही. तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. तो कसा आहे हे संपूर्ण दिल्लीला माहित आहे.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.