Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या मेहंदीनंतर करिश्माने पोस्ट केला पहिला फोटो

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मेहंदीचा कार्यक्रम बुधवारी (13 एप्रिल) पार पडला. या कार्यक्रमाला कुटुंबीय आणि मोजके पाहुणेच उपस्थित होते.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या मेहंदीनंतर करिश्माने पोस्ट केला पहिला फोटो
Karisma Kapoor shared photoImage Credit source: Instagram/ Varinder Chawla
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 9:57 AM

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मेहंदीचा कार्यक्रम बुधवारी (13 एप्रिल) पार पडला. या कार्यक्रमाला कुटुंबीय आणि मोजके पाहुणेच उपस्थित होते. रणबीरच्या ‘वास्तू’ या बंगल्यावरच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आणि याच ठिकाणी लग्नसुद्धा होणार आहे. रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी आणि चुलत बहिणी करिश्मा, करीना कपूर यांनी मेहंदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर करिश्मा (Karisma Kapoor) आणि रिधिमाने इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या तारखेविषयी अनेकांना संभ्रम होता. मात्र मेहंदीच्या कार्यक्रमातून बाहेर पडताना नीतू कपूर यांनी आज (14 एप्रिल) लग्न होणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. यावेळी त्यांनी होणाऱ्या सूनेचंही कौतुक केलं. “आलिया बेस्ट आहे”, असं त्या म्हणाल्या.

करिश्माने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पायावरील मेहंदीचा फोटो पोस्ट केला. ‘आय लव्ह मेहंदी’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. त्यासोबतच हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. मेहंदीच्या कार्यक्रमात करिश्माने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. त्यावर मांगटिका आणि पारंपरिक कानातले असा लूक तिने केला होता. करीना आणि करिश्मा या मेहंदीच्या कार्यक्रमाला एकत्रच पोहोचल्या होत्या. यावेळी करीनाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

रणबीरची बहीण रिधिमानेही तिच्या हातावरील मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केले. वधूपक्षाकडून सोनी राजदान, शाहिन भट्ट, महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आलियाला बॉलिवूडमध्ये लाँच करणारा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा यावेळी उपस्थित होता. मेहंदीनंतर छोटासा संगीत कार्यक्रमसुद्धा पार पडला. यासाठी प्रसिद्ध गायक प्रतीक कुहडला आमंत्रित करण्यात आलं होतं.

हेही वाचा:

‘आलिया’ वरातं, रणबीरच्या दारातं.. मेहंदीच्या कार्यक्रमाला सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा फोटो

Devmanus 2: ‘देवमाणूस २’ मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा; सेटवर जल्लोष

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.