AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांशी अफेअरची चर्चा, स्टारडम अनुभवल्यानंतर अचानक का गायब झाली आयेशा जुल्का?

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, तिने 90च्या दशकात केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर, आपल्या निरागस हास्याने लोकांची माने जिंकली. आपण बोलत आहोत, अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka) हिबद्दल, जिने 90च्या दशकांत 'जो जीता वही सिकंदर' (Jo Jeeta Wahi Sikander)  आणि 'खिलाडी' (Khiladi) सारख्या हिट चित्रपटांत काम केले होते.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांशी अफेअरची चर्चा, स्टारडम अनुभवल्यानंतर अचानक का गायब झाली आयेशा जुल्का?
आयेशा जुल्का
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 9:10 AM
Share

मुंबई : आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, तिने 90च्या दशकात केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर, आपल्या निरागस हास्याने लोकांची माने जिंकली. आपण बोलत आहोत, अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka) हिबद्दल, जिने 90च्या दशकांत ‘जो जीता वही सिकंदर’ (Jo Jeeta Wahi Sikander)  आणि ‘खिलाडी’ (Khiladi) सारख्या हिट चित्रपटांत काम केले होते (Khiladi Girl Ayesha Jhulka takes a break from the industry know the reason).

अभिनेत्री आयशा जुल्का ही तिच्या काळातील बड्या अभिनेत्रींमध्ये गणली जात होती. तथापि, अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आयशाने बॉलिवूडचा निरोप घेतला. आयशा सध्या कुठे आहे आणि ती काय करतेय?, हे जाणून घेण्यासाठी आयशाचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. चला तर, जाणून घेऊया बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री सध्या कुठे आहे आणि ती काय करते आहे…

चित्रपट विश्वापासून का गेली दूर?

आपल्या एका मुलाखतीत आयशा जुल्काने चित्रपट विश्वापासून दूर जाण्याचे कारण सांगितले होते. आयशाने म्हटले होते की, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा त्याला आपल्या जीवनाचा नेमका हेतू कळतो. मला आयुष्यात सेटल व्हायचे होते आणि त्या काळात मला शूटिंगसाठी बर्‍याच शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. मी माझे वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकत्रितपणे व्यवस्थापित करू शकले नाही, यामुळे मी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

पुनरागमन करण्याच्या तयारीत?

आयेशा केवळ हिंदी चित्रपटांमध्येच सक्रिय नव्हती, तर ती कन्नड, उडिया आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही काम करत होती. आयशाने सलग चित्रपटांत काम केले नाही. वर्षा चार वर्षांने ती एका चित्रपटात दिसायची. शेवटच्या वेळी ती 2018 मध्ये आलेल्या ‘जीनियस’ या चित्रपटात दिसली होती. आयशाने पूर्णपणे चित्रपटांकडे पाठ फिरवलेली नाही. ती पुन्हा एकदा पुनरागमन करेल, असे तिचे म्हणणे आहे. सध्या ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करत आहे आणि तिच्याकडे बऱ्याच डिजिटल ऑफर्सही आल्या आहेत.

आयशाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की, त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील काम करताना पाहता येईल.

अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांच्याशी जोडले गेले नाव!

चित्रपटाच्या कारकीर्दीत आयशा जुल्का हिचे नाव अनेकदा तिच्या सहकलाकारांशी जोडले गेले होते. या सहकलाकारांच्या यादीमध्ये अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा देखील समावेश आहे. आयशाने ‘खिलाडी’ या चित्रपटात अक्षयसोबत काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर या दोन्ही स्टार्सनी स्टारडमचा अनुभव घेतला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि आयशा जुल्का यांच्यातील नात्याची बातमी बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये चर्चेचा विषय ठरली. परंतु, या वृत्तांनी दोघांनीही नेहमीच फेटाळून लावले.

आयशाने 2003 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यासमवेत ‘आंच’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटामध्ये दोघांचे इंटिमेट सीन देखील बर्‍याच चर्चेचा विषय ठरले होते. त्यावेळेस नाना पाटेकर आपल्या पत्नीपासून विभक्त राहत होते. या चित्रपटादरम्यान आयशा आणि नाना पाटेकर यांच्यातील नाते संबंधांची बातमी चर्चेत येऊ लागली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्या काळात नाना अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत रिलेशनशिपमध्ये होते. आयशा आणि नाना यांच्या अफेअरची बातमी जेव्हा चर्चेत आली, तेव्हा मनीषा कोईराला संतापली. वृत्तानुसार मनीषाने आयशा आणि नाना पाटेकर यांना एकाच खोलीत पाहीले होते, त्यानंतर मनीषा आणि आयशा यांच्यात खूप भांडण झाले होते.

(Khiladi Girl Ayesha Jhulka takes a break from the industry know the reason)

हेही वाचा :

Video | ‘या’ लोकप्रिय मराठी गाण्यात दिसला होता ‘दया बेन’चा बोल्ड लूक, तुम्ही पाहिलंत का?

The Family Man 2 | लोणावळ्यात नेमकं काय घडलं? बहुचर्चित प्रश्नावर अभिनेत्री प्रियामणीची प्रतिक्रिया…

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.