Jhund: ‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..

बॉलिवूडच्या महानायकासोबत क्षणभरासाठी का होईना पण काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा सिनेसृष्टीतल्या प्रत्येक लहानमोठ्या कलाकाराची असते. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आजही ज्या जोमाने काम करतात, ते तरुणांनाही लाजवणारं आहे.

Jhund: 'अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो'; किशोर कदम म्हणतात..
Kishore Kadam and Amitabh BachchanImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 9:41 AM

बॉलिवूडच्या महानायकासोबत क्षणभरासाठी का होईना पण काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा सिनेसृष्टीतल्या प्रत्येक लहानमोठ्या कलाकाराची असते. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आजही ज्या जोमाने काम करतात, ते तरुणांनाही लाजवणारं आहे. बिग बींची यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट आज (4 मार्च) प्रदर्शित झाला. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे किशोर कदम. ‘झुंड’ प्रदर्शित झाल्याच्या निमित्ताने किशोर कदम (Kishore Kadam) यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बिग बींसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, याविषयी सांगितलं आहे. त्याचसोबत ‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो, कॉम्प्लेक्स येतो का रे त्याचा’; अशा प्रश्नांचीही उत्तरं त्यांनी या पोस्टमध्ये दिली आहेत.

किशोर कदम यांची पोस्ट-

‘यातल्या तिसऱ्या फोटो फ्रेममध्ये अमिताभ बच्चन हा एकच माणूस तुम्हाला दिसत असेल. मलाही तोच दिसतो आहे. तो असेल त्या फ्रेममध्ये आजवर खरं सांगतो कुणीही आणि कितीही माणसं असली तरी मला तोच दिसत आलाय इतका तो माणूस माझ्या मनाच्या पडद्यावर मोठ्ठा कोरला गेलाय. आजवर मी त्याला दोनदा भेटलो आहे. पहिल्यांदा आयबीएन लोकमत पुरस्कार मिळाला होता तेंव्हा आणि आता नागराजच्या ‘झुंड’च्या सेटवर सतत दहा दिवस. तेव्हाही मी एक फोटो काढला होता त्या सोबत पण नंतर मी तो कधी पाहायलाच नाही कारण त्यातही मला फक्त तोच दिसत होता. “अमिताभ बोल्तो का रे सेटवर?”, “कॅाम्प्लेक्स येतो का रे त्याचा ?”, “समोरच्याला घाबरवत असेल ना तो?”, “काय बोल्लास त्याच्या बरोबर”, असे अनेक प्रश्न कुणी कुणी विचारतात आणि त्यांना काय उत्तर द्यावं कळत नाही. जिथे त्या माणसा सोबत एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो त्या माणसाबद्दल असल्या प्रश्नांना उत्तरं देत बसणं मला फिजूल वाटतं. नागराजमुळे मला या महान माणसा सोबत काम करता आलं हे नागराजचे उपकारच. काल ‘झुंड’ पाहिला आणि हा माणुस किती ग्रेट ॲक्टर आहे हे पुन्हा एकदा कळलं. आपलं सगळं स्टारडम, अँग्री मॅनची प्रतिमा आणि लोकांनी दिलेलं देवत्व विसरून एका साध्या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका ज्या ग्रेसफुली हा माणूस करतो त्याला तोड नाही. नागराजसारख्या तीनेक चित्रपटांचा अनुभव असल्या दिग्दर्शका सोबत काम करण्याचा निर्णय हा माणूस घेतो तेव्हा नागराजमधलं इनबॅार्न टॅलेंन्ट कळण्याची क्षमता वर्षानुवर्षांचा अनुभव असल्या माणसालाच असू शकते हे आपल्याला कळतं,’ अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.

‘झुंड’ या चित्रपटाचा छोटासा का होईना पण भाग झाल्याचा आनंद किशोर कदम यांनी या पोस्टमधून व्यक्त केला. एकीकडे अमिताभ यांच्यासाररखा अनुभवी नट तर दुसरीकडे नागपूर परिसरातल्या झोपडपट्टी आणि फुटपाथवरील दहाबारा पोरं हे कॉम्बिनेशन नागराज यांनी फॅंन्ड्री , सैराट, नाळनंतर पुन्हा एकदा कशाप्रकारे शस्वी करून दाखवलं, याबद्दलही त्यांनी लिहिलं. ‘झुंड’ या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आमिर खान, धनुष यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या: मराठमोळ्या नागराज मंजुळेंसाठी अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; बिग बींचं कौतुक करावं तेवढं कमी!

संबंधित बातम्या: झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी

संबंधित बातम्या: पंगा लेने वाले रोते रह जाएंगे, जब ये झुंड आएगा, म्हणत अमिताभनं शेअर केला गाण्याचा टिझर

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.