Lata Mangeshkar | सुरांची श्रीमंती तर होत्याच, पण दीदी तितक्याच वैभवसंपन्नही होत्या! लता मंगेशकरांची प्रॉपर्टी माहितीये का कितीये?

Memorable Lata Mangeshkar : लता मंगेशकर प्रभाकुंज या मुंबईतील एका प्रतिष्ठीत इमारतीत राहतात. ही इमारत दक्षिण मुंबईतील पेडर रोड इथं आहे. लता मंगेशकर या गाड्यांच्याही शौकिन होत्या.

Lata Mangeshkar | सुरांची श्रीमंती तर होत्याच, पण दीदी तितक्याच वैभवसंपन्नही होत्या! लता मंगेशकरांची प्रॉपर्टी माहितीये का कितीये?
लता मंगेशकरांचा कारसोबत काढण्यात आलेला दुर्मिळ फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 10:44 AM

मुंबई : भारतात स्वरांची कोकिळा जर कुणाला बोललं जात असेल, तर ते फक्त लता मंगेशकर यांना. दुसरं नावं त्यांच्यासोबतच्या स्पर्धेतही कुणाचं नाही! लता मंगेशकर या स्वरांच्या बाबतीत श्रीमंत होत्याच. शास्त्रीय संगीत (Indian classical Music) असो की बॉलिवूड. मराठी भक्तीसंगीतातील गाणी असोत वा इतर कोणतीही.. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आपल्या वर्सटाईल गायकीची झलक संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला दाखवून दिली होती. स्वरांनी श्रीमंत असणाऱ्या या जादुई प्रसिद्ध गायिकेची श्रीमंती ही फक्त सुरांच्या बाबतीतच होती असं नाही. तर लता मंगेशकर यांची संपत्तीही तितकी मोठी होती. सलग सहा दशकं लता मंगेशकर यांनी आपल्या जादुई स्वरांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांची कमाई, त्यांची आवड ही असमान्य होती. शेकडो गाणी, वेगवेगळ्या भाषांमध्ये गाण्याचे प्रयोग, सर्वोच्च भारतीय सन्मान यासोबत लता मंगेशकर यांनी जगभरात आपल्या गाण्यांचे कॉन्सर्टही केले. आपल्या गाण्यांमधून त्यांनी जितके चाहते जमवले, तितकीच घसघशीत कमाईदेखील (Property of Lata Mangeshkar) केली. चला तर त्याबद्दलच जाणून घेऊयात…

किती होतं वैभव?

लता मंगेशकर यांची नेटवर्थ तब्बल 50 मिलियन युएसडी इतही असल्याची माहिती रिपब्लिकवर्ड.कॉम या वेबसाईटवर 28 सप्टेंबर 2020 रोजी देण्यात आलेल्या एका बातमीत सापडते. 50 मिलियन युएसडी म्हणजेत भारतीय चलनात तब्बल 3,68,01,500 इतकी रक्कम होते. म्हणजेत तब्बल 368 कोटी. आताच्या घडीला या रक्कमेत आणखी वाढ झाली असेल, असंही काही जाणकार सांगतात. लता मंगेशकर प्रभाकुंज या मुंबईतील एका प्रतिष्ठीत इमारतीत राहतात. ही इमारत दक्षिण मुंबईतील पेडर रोड इथं आहे. लता मंगेशकर या गाड्यांच्याही शौकिन होत्या. त्यांच्याकडे शेवर्लेट, ब्विक आणि क्रिसलर या एकाएक भारी ब्रॅन्डच्या महागड्या गाड्या आहेत. विशेष म्हणजे लता मंगेशकर यांना तर दिग्दर्शक यश चोप्रा यांनी गिफ्ट म्हणून महागडी मर्सिडीज दिली होती. वीर झारा या सिनेमासाठी त्यांनी गायलेल्या गाण्यामुळे खूश होऊन यश चोप्रा यांनी लता मंगेशकर यांना महागडी मर्सिडीज गिफ्ट दिली होती.

2001 साली लता मंगेशकर यांना भारतातील सर्वोच्चनागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. लता मंगेशकर या भारतरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आलेल्या दुसऱ्या भारतीय गायिका ठरल्यात. तर 2007 साली फ्रान्स सरकारनं लता मंगेशकर यांना ऑफिसर ऑफ दी लिजन ऑफ ऑनर पुरस्कारानंही गौरव करण्यात आला होता. लता मंगेशकर यांनी आतापर्यंत तब्बल 36 पेक्षा अधिक प्रादेशिक भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमधून गाणी गायली आहेत.

संबंधित बातम्या :

लता मंगेशकर यांच्याबाबतचे यादगार किस्से वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Chitragupta Death anniversary : जेव्हा लतादीदी संगीतकार चित्रगुप्त यांना म्हणाल्या, ‘चपलेवर भरोसा आहे, माझ्या आवाजावर नाही?’, वाचा संगीतमय किस्सा

कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.