AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्ट करण जोहरवर संतापली, माझं नाव घेऊ नकोस, वाचा काय घडलं?

यंदाही या शोमुळे करण जोहरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यंदाच्या हंगामात बाॅलिवूडमधील मोठ्या स्टारने शोमध्ये हजेरी लावली होती.

आलिया भट्ट करण जोहरवर संतापली, माझं नाव घेऊ नकोस, वाचा काय घडलं?
| Updated on: Sep 29, 2022 | 2:17 PM
Share

मुंबई : कॉफी विथ करणचे 7 वे (Koffee With Karan 7) सीजन नुकताच संपले आहे. करण जोहरचा शो कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. यंदाही या शोमुळे करण जोहरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यंदाच्या हंगामात बाॅलिवूडमधील मोठ्या स्टारने शोमध्ये हजेरी लावली होती. करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये आमिर खान, गाैरी खान, करीना कपूर, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, अक्षय कुमार असे मोठे स्टार उपस्थित राहिले होते. मात्र, या शोदरम्यान खरी चर्चा झाली ती आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नावाची…

कॉफी विथ करण सीजन 7 मध्ये प्रत्येक भागामध्ये आलिया भट्टचे करण जोहरने नाव घेतल्याचा आरोप केला जातोय. शोच्या लास्टच्या भागामध्ये करणने यावर स्पष्टीकरण दिले आहे. शोच्या ज्युरीने करण जोहरला विचारले की, शोमध्ये तू इतक्या वेळा आलिया भट्टचे नाव का घेतले? यावर स्पष्टीकरण देताना करण जोहर म्हणाला की, याविषयी माझ्यामध्ये आणि आलियामध्ये अगोदरच बोलणे झाले.

आलिया मला म्हणाली की, मी खूप जास्त आभारी आहे, पण आता शोमध्ये प्लीज माझे नाव घेऊ नको. दान‍िश सेठ करण जोहरला म्हणाला की, ब्रह्मास्‍त्र चित्रपटात आलिया भट्टने जेवढ्या वेळ शिवा शिवा म्हटले नाही, त्यापेक्षाही अधिक वेळा शोमध्ये तू आलिया, आलिया, आलिया म्हटले आहे.

त्यानंतर करण जोहर शोमधून थेट आलिया भट्टला फोन करतो. त्यावेळी आलिया म्हणते की, करण तू शपथ घे आणि म्हण की, यानंतर शोमध्ये तू माझे नाव कधीच घेणार नाही. हवे तर चुकीच्या गोष्टींसाठी माझे नाव घे…इतकेच नाही तर यावेळी बोलताना करण जोहर आणि आलिया भट्ट म्हणतात की, आपण लोकांना दाखवण्यासाठी फेक भांडणे देखील करूयात.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.