अभिनेते भगवान यांनी एक कानाखाली लावली अन् त्या बेशुद्ध झाल्या, वाचा ललिता पवार यांच्या जीवनातील ‘तो’ किस्सा
ललिता पवार यांनी 22 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांना, त्यांच्या कामाला आठवलं जातं. ललिता पवार यांच्या बाबतीत एक किस्सा घडला होता ज्यामुळे त्यांना आपले डोळे गमवावे लागले होते. त्या अपघाताविषयी जाणून घेऊयात...
आयेशा सय्यद, मुंबई : रामानंद सागर (Ramananad Sagar) यांच्या ‘रामायण’ (Ramayan) मालिकेतील मथरा आणि बॉलीवूड चित्रपटातील खतरनाक सासू म्हणजेच अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar) यांची आज पुण्यतिथी आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनात साकारलेल्या पात्रांविषयी भीती निर्माण केली.सासू आणि आईच्या भूमिका त्यांनी साकारल्या. ललिता पवार यांनी 22 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांना, त्यांच्या कामाला आठवलं जातं. ललिता पवार यांच्या बाबतीत एक किस्सा घडला होता ज्यामुळे त्यांना आपले डोळे गमवावे लागले होते. त्या अपघाताविषयी जाणून घेऊयात…
अभिनेते भगवान यांनी कानाखाली लगावली अन्
ही घटना आहे 1942 सालची. ‘जंग-ए-आझादी’च्या सेटवर एका सीनचं शूटिंग सुरू होतं. या सीनमध्ये अभिनेते भगवानला ललिता पवार यांना कानाखाली मारायची होती. अभिनेता भगवान यांनी ललिता यांच्या इतक्या जोरात कानाखाली मारली की ललिता खाली पडल्या. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर ललिता यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.या सगळ्याचा परिणाम असा झाला की ललिता कोमात गेल्या. दीड दिवस कोमात राहिल्या.नंतर त्या बऱ्या झाल्या. पण त्यांच्या उजव्या डोळ्याला अर्धांगवायू झाला. अर्धांगवायू कालांतराने हळूहळू बरा झाला. पण त्याचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला. अभिनेते भगवान यांना या गोष्टीचं कायम शल्य वाटत राहिलं.
ललिता पवार यांनी वयाच्या 9 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. एकदा ती वडिलांसोबत चित्रपटाचे शूटिंग पाहायला गेली असता दिग्दर्शक नाना साहेबांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी ललिता यांना बालकलाकाराची भूमिका ऑफर केली. त्यानंतर त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटातून पदार्पण केलं.
काही वर्षांतच त्याना इतकं यश मिळालं की वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी कैलास नावाचा एक चित्रपट देखील तयार केला. हा एक सायलेन्ट चित्रपट होता. यानंतर त्यांनी टॉकी चित्रपटाची निर्मितीही केली. हा चित्रपट होता ‘दुनिया क्या कहें’. याकाळात त्यांने मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक हिट चित्रपटांमध्ये काम देखील केलं. ललिता पवार यांची गणना त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये होत होती. सायलेंट आणि टॉकीज या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत:ला सर्वोत्कृष्ट सिद्ध करून दाखवलं.
संबंधित बातम्या