Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं गाणं ऐन भरात असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, पण पुरावा नव्हता!
Lata Mangeshkar : लता मंगेशकर… असा आवाज ज्या आवाजाचा परमेश्वरही फॅन असेल. लतादीदी आज इहलोकीचा प्रवास संपवून जग सोडून निघून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारताने रत्न गमावल्याची भावना आज प्रत्येकजण व्यक्त करत आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या चाळीशीत त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, ही गोष्ट […]
Lata Mangeshkar : लता मंगेशकर… असा आवाज ज्या आवाजाचा परमेश्वरही फॅन असेल. लतादीदी आज इहलोकीचा प्रवास संपवून जग सोडून निघून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारताने रत्न गमावल्याची भावना आज प्रत्येकजण व्यक्त करत आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या चाळीशीत त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, ही गोष्ट आज पुन्हा एकदा चर्चिली जातेय. याच विषप्रयोगाबद्दल स्वत: लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. ‘ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही कुणीही मंगेशकर कुटुंबीय त्या दिवसांबद्दल फार बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती, असं त्या म्हणाल्या होत्या.
लतादिदींचं गाणं भारतभरात पोहोचू लागलं होतं. बॉलिवूडला त्यांची चांगलीच ओळख होऊ लागलं होतं. सुरुवातीची त्यांची गाणी हिट ठरली. प्रत्येकाच्या ओठावर त्यांची गाणी रुंजी घालायला लागली. संगीतात लता पर्व सुरु झाल्यानंतर कुणाचीतरी दृष्ट लागली. वर्ष होतं 1963…. याच वर्षी लतादीदींवर विषप्रयोग झाला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणतात, ‘ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्याबद्दल फारसं बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती.
“विषप्रयोगादिवशी मी झोपून होते. त्यावेळी मला भयंकर अशक्तपणा होता. मी इतकी घाबरली होती की मला उठून चालताही येत नव्हती. चालेल की नाही, याची शाश्वतीही नव्हती. लता मंगेशकर यांची तब्येत खालावली होती. काही दिवस गाणं बंद होतं. मग हलक्या आवाजात चर्चा सुरु झाली आता त्या कधीच गाणार नाहीत. पण शेवटी दीदीच त्या… त्या पुन्हा उठून उभा राहिल्या..!
लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, “आमचे फॅमिली डॉक्टर आर.पी. कपूर होते. त्यांनी त्या काळात माझी खूपच काळजी घेतली. खरंतर त्यांच्यामुळे मी लवकर बरी झाले. विषप्रयोग झाल्यानंतरचे पुढचे 3 दिवस लता मंगेशकर पूर्णत: बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानंतर दीदी हळूहळू यातून सावरल्या.
संबंधित बातम्या