Liger | ‘लायगर’ चित्रपट साऊथ स्टार विजय देवरकोंडासाठी बॉलिवूडची कवाडं खुली करणार! अनन्या पांडेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार

तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने मोठा चाहता वर्ग निर्माण करणारा तरुण प्रतिभावान अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Devarakonda), करण जोहरच्या 'लायगर' (Liger)  या चित्रपटातून अनन्या पांडेसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Liger | ‘लायगर’ चित्रपट साऊथ स्टार विजय देवरकोंडासाठी बॉलिवूडची कवाडं खुली करणार! अनन्या पांडेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार
Liger
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 3:52 PM

मुंबई : तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने मोठा चाहता वर्ग निर्माण करणारा तरुण प्रतिभावान अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Devarakonda), करण जोहरच्या ‘लायगर’ (Liger)  या चित्रपटातून अनन्या पांडेसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘लायगर’ने कलाकारांसह प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

दक्षिणात्या चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील मोठी नावे ‘लायगर’मध्ये असल्याने, चित्रपटाने आधीच देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडासाठी बॉलिवूडची दारं खुली होणार आहेत. ‘कबीर सिंग’च्या यशामुळे अनेकांना मूळचा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’मधील विजयचा अभिनय देखील पाहायला मिळाला. याच तेलुगू चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘कबीर सिंग’ म्हणून रिमेक करण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसला आहे.

विजयची कारकीर्द

दिग्दर्शक रवी बाबू यांचा तेलुगु चित्रपट ‘नुव्विला’मधून विजयने मनोरंजन विश्वात एण्ट्री केली होती. शेखर कममुलाचा ‘लाइफ इज ब्युटीफुल’ हा त्याचा पुढचा चित्रपट होता. नाग अश्विन दिग्दर्शित ‘येवडे सुब्रह्मण्यम’ या चित्रपटाने विजयला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर तरुण भास्कर दिग्दर्शित ‘पेल्ली चोपुलु’ हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि त्यानंतर संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट देखील खूप गाजला.

हैदराबादी असणाऱ्या विजयने ‘पेल्ली चोपुलु’मध्ये तेलंगण बोली भाषेत जे संवाद बोलले, त्यांनी प्रेक्षकांना आकर्षित केले. यामुळे प्रेक्षकांना त्याच्याशी कनेक्टिव्हिटी जाणवली. एकाप्रकारे, टॉलीवूड चित्रपटांमध्ये तेलंगणा बोली भाषेच्या प्रसारात विजयची महत्त्वाची भूमिका होती. याआधी, चित्रपटांमध्ये अतिशय तटस्थ उच्चार होते जे सर्व क्षेत्रांतील दर्शकांना आवडू शकतात. परंतु, वास्तववादी चित्रपट ही आजच्या काळातील महत्वाची गोष्ट बनल्यामुळे, बोलीभाषेद्वारे वास्तवात भर पडली.

एका झपाटलेल्या टॅक्सीवर आधारित रिलीज झालेल्या विजयच्या ‘टॅक्सीवाला’नेही चांगली कामगिरी केली आहे. विजय शेवट दिग्दर्शक क्रांती माधवच्या ‘वर्ल्ड फेमस लव्हर’मध्ये दिसला होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. आता अभिनेत्याने त्याचे लक्ष दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांच्यासोबत त्याच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटाकडे वळवले आहे.

स्वतःचा फॅशन ब्रँड

अभिनेता विजय देवरकोंडा याने 2018 मध्ये स्वतःचा फॅशन ब्रँड, ‘राउडी क्लब’ लाँच केला. विशेष म्हणजे, स्वतःचा फॅशन ब्रँड सादर करणारा तो पहिला टॉलीवूड अभिनेता बनला आहे. आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा निर्णय ही एक नवी वाटचाल आहे, जी अभिनेत्यासाठी नवी संधी निर्माण करणार आहे. दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री तशी नवी गोष्ट नाही. परंतु आव्हानात्मक नक्कीच आहे. याआधीच्या दशकांमध्ये महिला कलाकारांचा प्रवास यशस्वी होताना दिसत होता.

विजय देवरकोंडा हा त्याच्या दक्षिणेतील हिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’नंतर प्रचंड चर्चेत आला आहे. अभिनेत्याने त्याचे जोरदार सोशल मीडिया अपील करत, स्वतःला मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. विजयचे आधीपासूनच 14 दशलक्ष इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. त्याचे तेलुगू चित्रपट यूट्यूबवर डब केले जातात आणि प्रदर्शित देखील केले जातात.

मोठी फॅन फॉलोइंग!

विजय देवरकोंडा इंडस्ट्रीतील एक असा अभिनेता आहे, ज्याला त्याच्या अ‍ॅक्शन हिस्ट्रिओनिक्सचा आनंद घेणार्‍या पुरुषांव्यतिरिक्त, मोठी महिला फॅन फॉलोइंग देखील आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी विजयसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

त्याचा आगामी चित्रपट ‘लायगर’ हा इंडस्ट्रीतील पुढचा मोठा अॅक्शन फ्लिक असल्याचे मानले जाते. अभिनेत्याने या भूमिकेसाठी तगडी तयारी केली आहे आणि अॅक्शन सीक्वेन्सचा सराव करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. करण जोहरच्या ‘लायगर’मध्ये अनन्या पांडे आणि माइक टायसन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सामाजिक कार्यातही अभिनेता अग्रेसर

सामाजिक समस्यांमध्ये पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी अभिनेता विजय देवरकोंडा प्रसिद्ध आहे. यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नावर तो अधिक काम करत आहे. ‘देवराकोंडा फाउंडेशन’ ही एक ना-नफा संस्था आहे, ज्याची संकल्पना विजय देवराकोंडा याने एप्रिल 2019 मध्ये केली होती. या संस्थेची स्थापना कोरोना संकटादरम्यान प्रभावित मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. यातील निधीने बाधित कुटुंबांना मूलभूत किराणा सामान आणि आवश्यक अन्नपदार्थ खरेदी करण्यास मदत केली होती.

आता विजय देवराकोंडा एक निर्माता देखील बनला आहे आणि त्याने त्याच्या होम प्रोडक्शन ‘किंग ऑफ द हिल’ मध्ये ‘पुष्पका विमानम’ हा पहिला चित्रपट यशस्वीरित्या लाँच केला आहे. हे प्रॉडक्शन हाऊस होतकरू दिग्दर्शकांना आणि चित्रपट तंत्रज्ञांना आर्थिक मदत करते.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.