Little Kiara : ‘ही’ लहान मुलगी अभिनयात कियारा आडवाणी पेक्षाही वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कियारा आडवाणीच्या एका छोट्या चाहतीनं सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Little Kiara: 'This' little girl copies Kiara Advani in acting, video goes viral on social media)

Little Kiara : 'ही' लहान मुलगी अभिनयात कियारा आडवाणी पेक्षाही वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:52 AM

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर ‘शेर शाह’ (Sher Shah) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून लोक या अभिनेत्यांसाठी वेडे झाले आहेत. विशेषतः कियाराचा लूक सर्वांनच्याच पसंतीस उतरत आहे. अभिनेत्रीचा साधा लूक इतका व्हायरल होत आहे की प्रत्येकजण तिला कॉपी करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, तिच्या चाहत्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कियाराला केलं कॉपी

कियारा आडवाणीच्या एका छोट्या चाहतीनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या चिमुकलीचं नाव कियारा खन्ना आहे आणि तिनं अभिनेत्री कियाराच्या प्रत्येक स्टाईलची नक्कल केली आहे. बेबी कियाराचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, हे व्हिडीओ पाहून प्रत्येकजण या चिमुकलीची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. तुम्ही सुद्धा हे खास व्हिडीओ पाहाच.

पाहा खास व्हिडीओ

‘शेर शाह’ ची कथा

कियारा आणि सिद्धार्थ स्टारर ‘शेर शाह’ कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. शेर शाह केवळ भारतीय लष्करातील कॅप्टन विक्रम बत्रा यांचा प्रवास दाखवत नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकतो. कियारा अडवाणीनं विक्रम बत्राच्या लव्ह लाईफ डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. शेरशाहमध्ये तुम्हाला दिसेल की एक लहान मूलं कसं ठरवतो की तो भारतीय लष्कराचा एक भाग बनेल आणि भारतीय सैन्यात सामील झाल्यावर तो प्रत्येकाची मनं जिंकतोच पण शत्रूंना हुसकावून लावतो.

चित्रपटात काय आहे विशेष

‘शेरशाह’ तुम्हाला विक्रमच्या आयुष्यातील त्या क्षणांपर्यंत नेतो, ज्याबद्दल तुम्ही कदाचित वाचलंही नसेल किंवा पाहिलंही नसेल. सैन्यात भरती होण्यापासून ते महाविद्यालयीन जीवनातील मजा आणि कारगिल युद्धातील पॉईंट 4875 च्या विजयापर्यंत 24 वर्षांच्या पहिल्या लष्करी मोहिमेची आज्ञा देण्यापर्यंत, तुम्हाला चित्रपटातील प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल. सुमारे 2 तास 15 मिनिटे चित्रपट पाहिल्यानंतरही तुम्हाला वाटतं की चित्रपट थोडा जास्त लांब असायला हवा होता जेणेकरून आम्हाला विक्रम बत्राबद्दल अधिक माहिती  मिळेल. विशु वर्धन यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट होतं.

संबंधित बातम्या

KBC 13: फराह खाननं सांगितली आयांशला 16 कोटीच्या इंजेक्शनची गरज, अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान केलं गुप्तदान

Kangana Ranaut Lookalike : कंगना रनौतची कार्बन कॉपी आहे ही ‘छोटी कंगना’, ‘थलायवी’ लूकमधील फोटो व्हायरल

Crime-Thriller Films | या विकेंडला क्राईम-थ्रिलर चित्रपट-सीरीज पाहण्याचा विचार करताय? मग, ‘या’ पैकी एकाची निवड नक्की करा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.