माधुरी दीक्षित राजकारणात एन्ट्री करणार? स्वत: अभिनेत्रीने टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यासमोर दिलं स्पष्ट उत्तर

माधुरी दीक्षित लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर माधुरी दीक्षितने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. माधुरीने आज आपल्या पतीसह 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी माधुरीने सविस्तर भूमिका मांडली.

माधुरी दीक्षित राजकारणात एन्ट्री करणार? स्वत: अभिनेत्रीने टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यासमोर दिलं स्पष्ट उत्तर
madhuri dixit
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 10:22 PM

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : देशात आगामी काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत मुंबईतील एका मतदारसंघातून अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अखेर याबाबतच्या चर्चांवर स्वत: माधुरी दीक्षितने उत्तर दिलं आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. माधुरी दीक्षितने ‘पंचक’ या नव्या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत माधुरी दीक्षित यांना राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माधुरी दीक्षितने सविस्तर भूमिका मांडली. यावेळी माधुरी दीक्षित सोबत तिचे पती श्रीराम नेने हे देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील या प्रश्नावर उत्तर दिले. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती श्रीराम नेने हे पंचक चित्रपटाचे निर्माते आहेत.

“सगळे मला विचारत आहेत, आणि मी काहीच बोललेली नाही म्हणून म्हणत आहेत. ठीक आहे. माझं पॅशन हे क्रिएटिव्ह फिल्म आहे. त्यातून इम्पॅक्ट तयार करायचा. पण राजकारण ही माझी आवड नाही. मला असं वाटत नाही की मी त्यासाठी बनले आहे”, अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने दिली. याच प्रश्नावर श्रीराम नेने यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “वेगवेगळ्या चित्रपटांतून लीड करता येतं, रोल मॉडेल बनता येतं. राजकारण हे एक क्षेत्र आहे. पण चित्रपट, तंत्रज्ञान, आरोग्य विभागातही काहीतरी चांगलं काम केलं, तर त्याचा सगळ्यांना फायदा होतो”, असं श्रीराम नेने म्हणाले.

कोकणी भाषा येते का?

यावेळी माधुरी दीक्षितला कोकणी भाषा येते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माधुरीने “नाही, मला एवढी कोकणी भाषा येत नाही, पण समजते”, असं उत्तर दिलं. “माझी आजी कोकणी भाषेतली गाणी म्हणायची. माझी आई मराठी बोलायची. पण आजी कोकणी बोलायची”, असं माधुरी दीक्षितने सांगितलं. यावेळी माधुरीने कोकणी गाण्याच्या काही ओळी बोलून दाखवल्या.

यावेळी माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने यांनी सर्व प्रेक्षकांना 5 जानेवारीला ‘पंचक’ चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याचं आवाहन केलं. तुम्हाला चित्रपट बघून मजा वाटली तर आम्हाला नक्की कळवा, असं श्रीराम नेने म्हणाले. “श्रद्धा -अंधश्रद्धा यांची आपली जागा असते. आपलं आयुष्य आपणच घडवत असतो. त्यामुळे आयुष्यात बॅलेन्स असलं पाहिजे. आयुष्यात भीती वाटली तर घाबरुन जावू नये तर बॅलेन्स विचारांनी त्याचा सामना करायला हवा”, अशी माहिती माधुरी दीक्षितने आपल्या चित्रपटाबाबत दिली.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.