Malaika Arora | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये वाद? अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते थेट म्हणाले…
मलायका अरोरा ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना मलायका ही कायमच दिसते.
मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा (Malaika Arora) हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा हे विदेशात फिरायला गेले होते. यावेळी अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Social media) शेअर केले. कायमच मलायका आणि अर्जुन कपूर हे त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत असतात. चाहते अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. अनेकदा अर्जुन कपूर आणि मलायका यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. मात्र, यांनी आपल्या लग्नाच्या प्रश्नांवर नेहमीच उत्तर देणे टाळले आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही मोठा खुलासा करताना दिसली. अर्जुन कपूर याच्याबद्दल सांगताना मलायका अरोरा म्हणाली होती की, मी कायमच अर्जुन कपूर याला माझ्या स्वत: च्या हाताने तयार करून जेवायला देते. कारण अर्जुन कपूर याला किचनमध्ये काहीच करता येत नाही. साधा त्याला चहा देखील बनवता येत नाही.
काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे. या चर्चेवर माैन सोडत अर्जुन कपूर याने खडेबोल सुनावले होते. अनेकदा मुंबईमध्ये देखील अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे स्पाॅट होताना दिसतात. बाॅलिवूडच्या पार्ट्यांमध्येही अर्जुन कपूर आणि मलायका हे एक सोबतच सहभागी होतात.
सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ मुंबईमधील आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा भडकल्याचे दिसत आहे. मलायका अरोरा हिला पाहुण एक कॅमेरामॅन हा धावत मलायकाच्या दिशेने जातो. मात्र, यावेळी त्याचा धक्का हा मलायका अरोरा हिला लागतो.
यानंतर मलायका भडकते आणि म्हणते थोडे आराम, इतके काय अर्जंट काम आहे? त्यानंतर मलायका थोडी शांत होते आणि तिथून निघून जाते. आता हाच मलायका हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा ही नेहमीच शांत राहते. मात्र, मलायकाला असे रागात पाहून चाहत्यांनी थेट मलायका अरोरा हिचे अर्जून कपूर याच्यासोबत भांडण झाल्याचे थेट म्हटले आहे.