शेतकरी आंदोलनावरून प्रियांकाला टोला आता मियाच होतीये ट्रोल, वाचा काय झाल!
पॉपस्टार रिहानाने काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे सुरू असेलल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात एक ट्विट केलं होतं आणि शेतकऱ्यांच समर्थन केलं होत.
मुंबई : पॉपस्टार रिहानाने काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे सुरू असेलल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात एक ट्विट केलं होतं आणि शेतकऱ्यांच समर्थन केलं होत. त्यानंतर पॉर्नस्टार मिया खलीफा (Mia Khalifa) हिने देखील ट्विट केलं होत आता तिने परत एकदा याच संदर्भात ट्विट करून प्रियांका चोप्रावर (Priyanka Chopra) निशाणा साधला आहे. तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काय मिसेज जोनस तु याबद्दल काहीच बोलणार नाहीस का? तु गप्प का आहेस मात्र, मिया खलीफा हिच्या या ट्विटवरून आता तिलाच ट्रोल केलं जात आहे. (Mia Khalifa trolled on social media)
Is Mrs. Jonas going to chime in at any point? I’m just curious. This is very much giving me shakira during the Beirut devastation vibes. Silence.
— Mia K. (@miakhalifa) February 7, 2021
कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने ट्विट करून समर्थन केले होते. प्रियांकाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. यामधून काहीतरी मार्ग काढावा. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग, आणि मिया खलीफा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.
त्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विट करत ‘भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं’, अशा शब्दात त्यांना फटकारलं. तसंच गौतम गंभीरनेही मोदींवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना धारेवर धरलं होतं. पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं होत. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं होतं इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला होता.
संबंधित बातम्या :
Video | जेनेलिया डिसूझाचा ‘तो’ व्हिडीओ चाहत्यांना आवडला, चाहते म्हणाले…
आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला….!
करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो…
(Mia Khalifa trolled on social media)