Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

कोरोना विषाणूचा (Corona) उद्रेक आता पुन्हा दिसू लागला आहे. आता ‘मिस वर्ल्ड 2021’च्या (Miss World 2021) ग्रँड फिनाले इव्हेंटमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या स्पर्धक मानसा वाराणसी या कोरोना विषाणूच्या विळख्यात आली आहे. ती सध्या पोर्तो रिकोमध्ये आयसोलेशनमध्ये आहे.

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!
MANSA VARANASI
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 10:46 AM

मुंबई : कोरोना विषाणूचा (Corona) उद्रेक आता पुन्हा दिसू लागला आहे. आता ‘मिस वर्ल्ड 2021’च्या (Miss World 2021) ग्रँड फिनाले इव्हेंटमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या स्पर्धक मानसा वाराणसी या कोरोना विषाणूच्या विळख्यात आली आहे. ती सध्या पोर्तो रिकोमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. अशा स्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

या स्पर्धेची महाअंतिम फेरी पुन्हा शेड्यूल केले जाईल, असे सांगितले जात आहे. हरनाज संधूने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा ‘मिस वर्ल्ड 2021’वर लागल्या आहेत. मानसा वाराणसी ‘मिस वर्ल्ड 2021’ स्पर्धेत भारतातून सहभागी होणार होती. ‘मिस इंडिया 2020’ चा मुकुट तिने डोक्यावर सजवला आहे.

पाहा निवेदन :

आणखी स्पर्धकांना कोरोनाची लागण

मानसा वाराणसीसह आणखी 17 स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्वांना पोर्तो रिकोमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनसा वाराणसी ‘मिस वर्ल्ड 2021’ स्पर्धेत भारताकडून सहभागी होणार होती. तिने या आधी ‘मिस इंडिया 2020’ हा किताब मिळवला आहे.

मिस वर्ल्ड स्पर्धेची महाअंतिम फेरी त्याच ठिकाणी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धक आणि संबंधित कर्मचार्‍यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यास त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली जाईल.

कोण आहे मनसा?

हैदराबाद, तेलंगणा येथे जन्मलेल्या मनसा वाराणसी या व्यवसायाने फायनानशियल एक्सचेंज इनफॉर्मेशन एनालिस्ट आहे. मिस इंडिया होण्यापूर्वी मनसा मिस तेलंगणा देखील बनली आहे. 23 वर्षीय मनसाचे शालेय शिक्षण वासवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून झाले आहे.

हेही वाचा :

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

Miss universe 2021 : भारताच्या अप्सरा एकाच वर्षी दोन किताब जिंकणार? मनसा वाराणसीकडे सर्वांच्या नजरा

Spider-Man No Way Home review : टॉम हॉलंडची चालली जादू, जाणून घ्या कसा आहे स्पायडर मॅन चित्रपट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.