Mission Majnu |‘मिशन मजनू’ चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन ‘मिशन मजनू’ हा चित्रपट तयार करणार आहे.

Mission Majnu |‘मिशन मजनू’ चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:39 PM

मुंबई : ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला (Ronnie Screwvala) आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) हा चित्रपट तयार करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे, त्यात सिद्धार्थ अत्यंत आक्रमक लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. (Mission Majnu movie poster displayed)

या चित्रपटात 1970 पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माते शांतनु बागची या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

रश्मिकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

रश्मिका मंदानाने साउथच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. आता रश्मिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. याबद्दल रश्मिका म्हणते की, मला विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. पुढे म्हणते की, या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे की, त्यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली. मी खूप उत्सुक आहे या चित्रपटात काम करण्यासाठी, हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवास सुरू झाल्याने आणि नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप उत्साही आहे.

याबद्दल निर्माता रॉनी स्क्रूवाला म्हणतात, “असे बरेच हीरो आहेत ज्यांनी आपल्या देशाला अतिरेकी आणि वाईट देशांपासून वाचवण्यासाठी पडद्यामागे काम केले आहे.” त्यांच्या कार्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि ‘मिशन मजनू’ त्यावरच आधारित आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी खूप महत्वाचे काम केले आहे. आणि त्यांच्याबद्दल कोणाला जास्त माहिती नाही. या चित्रपटातून आम्ही त्यांची खरी कथा पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘मिशन मजनू’ रॉ च्या इतिहासातील सर्वात धैर्यवान आणि साहसी विषयी एक रोमांचकारी कथा आहे.

संबंधित बातम्या :

Fitness Freak : विकी कौशलचा नवा लूक, आगामी चित्रपटासाठी तयारी करत असल्याची चर्चा

Kangana Ranaut | कंगनाला ट्विटरवर मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार, हायकोर्टाचा दिलासा!

(Mission Majnu movie poster displayed)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.