Sonu Nigam | आमदाराच्या मुलाची सोनू निगम याच्या अंगरक्षकासोबत हुज्जत, नंतर धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यासोबत एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आलीय. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Sonu Nigam | आमदाराच्या मुलाची सोनू निगम याच्या अंगरक्षकासोबत हुज्जत, नंतर धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 12:06 AM

मुंबई : गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यासोबत एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आलीय. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सोनू निगम सारख्या बड्या आणि नामांकीत गायकासोबत कुणी धक्काबुक्की केली असेल? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. यादरम्यान एका आमदाराच्या मुलाचा सोनू निगमच्या अंगरक्षकाशी वाद झाल्याची माहिती समोर येतेय. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आलीय. सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी स्वप्नील फातर्पेकर हेही तिथे होते.

हे सुद्धा वाचा

या गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षसोबत किरकोळ धक्काबुकीं झाल्यानंतर स्वप्नील यांनीदेखील एका अंगरक्षकाला धक्का दिला. त्यावरुन हा वाद झाल्याचं समोर येतंय. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमला इजा झाली नसल्याचं पोलिसांच म्हणणं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमला चेंबूरमधील कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे सेलिब्रेटींवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी बुधवारी 15 फेब्रुवारीला मुंबईत एका पबमध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर देखील हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला होता.

पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांच इंफ्लुएंसर सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत फोटो काढण्यावरुन वाद भांडण झालं होतं. हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. पबच्या बाहेर पृथ्वी स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपी मुलीच्या हातून बेसबॉलची बॅट काढून घेताना दिसला होता.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. 8 लोकांनी मिळून गाडीवर हल्ला केला व मारहाणीचा प्रयत्न केला असा आरोप आहे. पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर इंफ्लुएंसर सपना गिलला पोलिसांनी अटक केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.