Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez) जबाब नोंदवला आहे. जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीत चार तास चौकशी केल्यानंतर, तिचा जबाब मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यामध्ये सुकेश चंद्रशेखर, 200 कोटींपेक्षा जास्त फसवणूक आणि खंडणीचा आरोपी आहे.

Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!
Jacqueline Fernandez
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 4:24 PM

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez) जबाब नोंदवला आहे. जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीत चार तास चौकशी केल्यानंतर, तिचा जबाब मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यामध्ये सुकेश चंद्रशेखर, 200 कोटींपेक्षा जास्त फसवणूक आणि खंडणीचा आरोपी आहे. मात्र, आता अभिनेत्रीची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावण्यात आले आहे. अभिनेत्रीला 25 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

नोराची फतेहीची चौकशी केली जाणार!

याआधी जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात साक्षीदार म्हणून नवी दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती. म्हणजे आता 25 सप्टेंबर रोजी ईडी पुन्हा अभिनेत्रीची चौकशी करणार आहे. त्याचबरोबर आता ईडीने अलीकडेच अभिनेत्री नोरा फतेहीलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

अहवालांनुसार, हा खटला सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे. रोहिणी तुरुंगात अंडर ट्रायल सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या 20 स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी श्रीलंकेहून आली होती

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी जॅकलिन श्रीलंकेहून आली होती. 2009 मध्ये जॅकलिनने अलादीन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जॅकलिनसोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर, ‘जाने कहा से आयी है’ या चित्रपटात दिसली. तथापि जॅकलिनला हाऊसफुल चित्रपटातील धन्नो गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली. यानंतर मर्डर 2 मध्ये जॅकलिनने तिच्या हॉट अवताराने सर्वांना हैराण केले. त्यानंतर जॅकलिनच्या करिअरचा आलेख वाढतच गेला. यानंतर जॅकलिनने हाऊसफुल 2, रेस 2, किक सारखे हिट चित्रपट दिले.

वैयक्तिक आयुष्यामुळे जॅकलिन चर्चेत

जॅकलिनने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली, जेव्हा तिचे साजिद खानसोबत नाव जोडले होते, तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा खूप रंगली होती. एवढेच नाही तर दोघेही अनेक पार्टी आणि लंच किंवा डिनर डेट्सला जायचे. पण नंतर अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. तथापि, दोघांनीही कधीही ब्रेकअपवर टिप्पणी केली नाही. जॅकलिन सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

हेही वाचा :

यांचं नेमकं चाललंय तरी काय? किरण राव-आमिर खानच ‘वेडिंग फोटोसेशन’ पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न!

Shah Rukh Khan | सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘#BoycottShahRukhKhan’, नेमकं कारण तरी काय?

Kho Gaye Hum Kahan : सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव अभिनीत ‘खो गए हम कहाँ’ची घोषणा!, पाहा खास फोटो

Sonu Sood | आयकर विभाग अधिकारी पुन्हा सोनू सूदच्या घरी, आधीही 20 तास झाडाझडती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.