तब्बल 18 महिन्यांनंतर झाले मौसमी चटर्जींच्या मुलीच्या अस्थींचे विसर्जन, जावयाने सांगितले कारण!

2019 मध्ये अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांची मुलगी पायल (Payal) हिचे निधन झाले होते. मुलीच्या निधनानंतर मौसमी आणि त्यांचे जावई यांच्यात बरेच वाद निर्माण झाले होते. आता मौसमी चटर्जी यांचा जावई डिकी सिन्हा यांनी 18 महिन्यांनंतर पत्नी पायल यांच्या अस्थींचे विसर्जन केले आहे.

तब्बल 18 महिन्यांनंतर झाले मौसमी चटर्जींच्या मुलीच्या अस्थींचे विसर्जन, जावयाने सांगितले कारण!
मौसमी चॅटर्जी
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 1:38 PM

मुंबई : 2019 मध्ये अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांची मुलगी पायल (Payal) हिचे निधन झाले होते. मुलीच्या निधनानंतर मौसमी आणि त्यांचे जावई यांच्यात बरेच वाद निर्माण झाले होते. आता मौसमी चटर्जी यांचा जावई डिकी सिन्हा यांनी 18 महिन्यांनंतर पत्नी पायल यांच्या अस्थींचे विसर्जन केले आहे. डिकी यांनी पायलच्या अस्थी आतापर्यंत घराबाहेर ठेवल्या होती आणि आता त्यांनी त्रिवेणी संगममध्ये त्यांचे विसर्जन केल आहे (Moushumi Chatterjee daughter Payal’s ashes immerse in triveni sangam after 18 months).

याबद्दल बोलताना डिकी म्हणाले, ‘पायलच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मी तिला वचन दिले होते की, मी तिच्या अस्थी तिच्या आवडत्या धार्मिक ठिकाणी म्हणजेच त्रिवेणी संगम येथे विसर्जित करेन. तिला स्वतःलाही त्रिवेणी संगमला जायचे होते, पण आम्हाला जाता आले नाही. आत्तापर्यंत मी तिच्या अस्थी राख घराच्या बाहेर ठेवल्या होत्या आणि आता त्या त्रिवेणी संगमात विसर्जित केल्या आहेत. ती जिथे असेल, तिथे आनंदी असेल. मी तिच्यासाठी काहीही करु शकतो.’

इतके दिवस अस्थी विसर्जन न करण्याबद्दल डिकी म्हणाले की, ‘मागच्या वर्षी मी त्रिवेणीसाठीच तिकिटे बुक केली होती, पण कोरोनामुळे उशीर झाला. आणि याच काळात मी माझं सर्वस्व माझी पत्नी गमावली. पायलच्या जाण्याने मी एकटा पडलो आहे.’ मौसमी आणि त्यांचे पती यांचा पायल आणि डिकी यांच्याशी संबंध नसल्याची बातमी समोर येत आहे. पायल यांचे निधन झाले तेव्हाही डिकीने सांगितले होते की, मौसमी मुलीला शेवट बघायला देखील आल्या नव्हत्या.

नेमकं काय झालं?

वृत्तानुसार, चॅटर्जी आणि डिकी एकत्र व्यवसाय करत होते आणि त्यातील अडचणींमुळे दोघांमध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर पायलला मधुमेह झाला आणि ती 30 महिन्यांपर्यंत कोमामध्ये होता. यानंतर पायलची प्रकृती थोडी सुधारली होती आणि ती आधार घेत चालू लागली होती. पण, त्यानंतर पायलच्या नेफ्रोलॉजिकल सिस्टममुळे शरीरात बरीच गुंतागुंत होण्यास सुरुवात झाली. त्यांच्यावर 2 शस्त्रक्रिया झाल्या, त्यापैकी एक मेंदूवरही होती.

2018 मध्ये, मौसमीने डिकीविरोधात तक्रार दिली की, तो पायलची नीट काळजी घेत नाहीय आणि त्यांची मुलगी त्यांच्याकडे आली पाहिजे. पण पायल शेवटपर्यंत डिकीबरोबरच राहिली. डिकी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘पायलच्या निधनानंतर मौसमी तिला बघायलाही आल्या नव्हत्या. पायलच्या अंत्ययात्रेत केवळ तिचे वडील व बहीण आले होते.’

(Moushumi Chatterjee daughter Payal’s ashes immerse in triveni sangam after 18 months)

हेही वाचा :

PHOTO | सलमान रश्दी यांच्या प्रसिद्ध कांदबरीवर आधारित होता ‘हा’ बॉलिवूड चित्रपट, जाणून घ्या…

Love Story | कॉलेजमध्ये झाली पहिली भेट, मैत्रीचे झाले प्रेमात रुपांतर! वाचा गिन्नी-कपिल शर्माची लव्हस्टोरी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.