Jersey: प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळूनही ‘जर्सी’ची कमाई कमी का? मृणाल ठाकूरने व्यक्त केली निराशा

'जर्सी'च्या (Jersey) तेलुगू आणि या हिंदी व्हर्जनचं दिग्दर्शन गौतम तिनानुरी यांनीच केलं. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 52 कोटी कमावले होते.

Jersey: प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळूनही 'जर्सी'ची कमाई कमी का? मृणाल ठाकूरने व्यक्त केली निराशा
JerseyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:11 AM

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा ‘जर्सी’ (Jersey) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. मूळ तेलुगू चित्रपटात अभिनेता नानी आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाचं कथानक आणि शाहिद-मृणालच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं असलं तरी बॉक्स ऑफिसवर मात्र त्याला तितकं यश मिळालं नाही. अवघ्या 20 कोटींची कमाई करण्यासाठीही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच संघर्ष करावा लागला. चित्रपटाच्या कमाईवर कोणत्या गोष्टींचा परिणाम झाला असेल यावर मृणाल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाली. यशच्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ या चित्रपटाचाही ‘जर्सी’च्या कमाईला फटका बसला. चित्रपटाने चांगली कमाई केली नसल्याने आपली निराशा झाल्याचं मृणालने या मुलाखतीत सांगितलं. कदाचित तेलुगू चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जनसुद्धा उपलब्ध असल्याने कमाईवर परिणामा झाला असेल, अशी शक्यता तिने व्यक्त केली.

“चित्रपट चांगला व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले आहेत. कदाचित हा एक ठराविक काळ असा असेल किंवा कदाचित इतरही काही कारणं असू शकतील. नेमके आम्ही कुठे कमी पडलो, तेच मला कळत नाहीये. अर्थातच असं काही झालं तर थोडंसं गडबडल्यासारखं वाटतं. तुम्ही थोडे निराश होता. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मी थोडं वाईट वाटलं. पण पुढच्या चित्रपटासाठी आम्ही अधिक मेहनत घेऊ”, असं ती ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

“चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले असले तरी अजूनही लोक थिएटरमध्ये तो बघायला जात आहेत. हळूहळू का होईना पण लोकांचा प्रतिसाद मिळतोय. डब केलेला मूळ चित्रपट टेलिव्हिजनवर आणि युट्यूबवर उपलब्ध असल्याने कदाचित कमाईवर परिणाम होत असावा. पण यासोबत इतरही घटक कारणीभूत असू शकतात,” असं ती पुढे म्हणाली.

‘जर्सी’च्या तेलुगू आणि या हिंदी व्हर्जनचं दिग्दर्शन गौतम तिनानुरी यांनीच केलं. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 52 कोटी कमावले होते. तर शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ने पहिल्या वीकेंडला फक्त 14 कोटींचा गल्ला जमवला. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 17.20 कोटी रुपये कमावले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.