AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसीरुद्दीन शहांचं असं काही ट्वीट की नेटकरी भडकले, पण पत्नी रत्ना पाठकनं केला धक्कादायक खुलासा !

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.

नसीरुद्दीन शहांचं असं काही ट्वीट की नेटकरी भडकले, पण पत्नी रत्ना पाठकनं केला धक्कादायक खुलासा !
| Updated on: Feb 09, 2021 | 2:03 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनावर नसीरुद्दीन शाहने ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली होती आणि त्यांच्या ट्विटमुळे ते चर्चेत आले होते. मात्र, आता या सर्व प्रकारावर नसीरुद्दीन शाह यांची पत्नी अभिनेत्री रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे त्यांचे म्हणणे आहे, नसीरुद्दीन शाह यांचे कोणतेही ट्विटर अकाउंट नाही. (Naseeruddin Shah’s wife Ratna Pathak made a big revelation on that tweet)

यामुळे शेतकरी आंदोलनावर भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी मांडली नसून त्यांचे ते फेक अकाउंट आहे. याबाबत त्यांनी या अगोदर साइबर क्राइम सेलकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रत्ना म्हणाला, मिस्टर शाह यांचे कोणतेही ट्विटर अकाउंट नाही, परंतु आम्ही त्यांच्या नावाने असलेली फेक अकाउंट बंद अपयशी ठरलो आहोत. आम्ही सायबर क्राइम शाखेकडे तक्रार केली होती, परंतु आम्हाला सांगण्यात आले की ते त्यांच्याबद्दल काहीही करू शकत नाहीत. असे फेक अकाउंट बंद करण्यासाठी आमची मदत करा.

त्या ट्विटमध्ये नेमके काय “शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं आहे. बॉलिवूडमधील अनेकांना शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यास आपलं खूप मोठं नुकसान होईल, अशी भीती वाटतेय, पण त्यांनी आधीच आपल्या 7 पीढ्या बसून खातील इतकं कमावलं आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका घ्यावी, नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हजारो शेतकरी भाऊ बहिणी, वयोवृद्ध शेतकरी, लहान मुलं दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीत या सरकारकडे आपला हक्का मागत आहेत.

शेतकरी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन न्याय मागत आहेत. या सर्वांना माझा सलाम. या देशाचे सत्ताधारी शेतकऱ्यांसोबत बिघडलेल्या आई-बापासारखं वर्तन करत आहेत. हे आई-बाप आपल्या मुलाने काही मागणी केल्यास तुला काहीच माहिती नाही असं उत्तर देतात. तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं, असंही ते सांगतात.”

संबंधित बातम्या : 

गावकरी म्हणाले, आमच्या गावात माकडांचा उच्छाद वाढलाय, सोनू म्हणाला, आता तेवढंच करायचं राहिलं!

Video | लेकीनं ट्विंकल खन्नासाठी गिटार वाजवून गायलं गाणं, पाहा व्हिडीओ !

कंगना रनौतच्या ‘त्या’ ट्विटविरोधात तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता!

(Naseeruddin Shah’s wife Ratna Pathak made a big revelation on that tweet)

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.