Drugs Case | दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक, तब्बल 200 किलो गांजा जप्त!

ड्रग कनेक्शन प्रकरणात एनसीबी (NCB) तपास करत आहे. यामध्ये रोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची नावे एकामागून समोर येत आहेत.

Drugs Case | दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक, तब्बल 200 किलो गांजा जप्त!
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 10:46 AM

मुंबई : ड्रग कनेक्शन प्रकरणात एनसीबी (NCB) तपास करत आहे. यामध्ये रोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची नावे एकामागून समोर येत आहेत. आता अशी एक बातमी पुढे आली आहे एनसीबीने या प्रकरणात दिया मिर्झाच्या (Dia Mirza) एक्स मॅनेजरला अटक केली आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार शनिवारी एनसीबीने ही कारवाई केली असून यामध्ये चार लोकांना अटक केली आहे. या चौघांमध्ये दोन भारतीय आणि दोन ब्रिटिश नागरिक आहेत. यावेळी एनसीबीने गांजा देखील जप्त केला. अटक केलेल्या भारतीयांपैकी एक म्हणजे दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहीला फर्निचरवाला आहे. (NCB arrested Dia Mirza’s ex-manager in a drugs case)

या प्रकरणी एनसीबीचा तपास सुरू आहे एनसीबीने या प्रकरणावर म्हटले आहे की, माहितीच्या आधारे वांद्रे वेस्टमधून कुरिअरमध्ये गांजा सापडला. त्यानंतर एका कारवाईत करण सजनानी ब्रिटीश नागरिक याच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. त्या कारवाई दरम्यानच एनसीबीला आधिक माहिती मिळाली त्यात राहीला फर्निचरवालाचे नाव पुढे आले. त्यावेळी राहीला फर्निचरवाला आणि तिची बहिण साहिस्ता यांच्याकडे गांजा सापडला. एनसीबीने एकूण 200 किलो गांज्या जप्त केला आहे

काही दिवसांपूर्वी अजून रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली होती. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या होत्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या : 

Viral Video | नोरा फतेहीच्या डान्सने चाहते घायाळ, नेटवर फक्त नोरा… नोरा…..!

Dhakad | भोपाळच्या गुलाबी थंडीत कुल अंदाजात दिसली कंगना, शूटिंग करतानाचे खास फोटो

(NCB arrested Dia Mirza Mirza’s ex-manager in a drugs case)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.