Nora Fatehi | बॉलिवूडवर कोरोनाचा कहर! ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीलाही कोरोना विषाणूची लागण!

'दिलबर... दिलबर...' या सुपरहिट गाण्यासह अनेक चित्रपट गाण्यांमध्ये डान्स करताना दिसणारी नोरा फतेही (Nora Fatehi ) आता कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर तिने स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे.

Nora Fatehi | बॉलिवूडवर कोरोनाचा कहर! ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीलाही कोरोना विषाणूची लागण!
Nora Fatehi
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 2:32 PM

मुंबई : ‘दिलबर… दिलबर…’ या सुपरहिट गाण्यासह अनेक चित्रपट गाण्यांमध्ये डान्स करताना दिसणारी नोरा फतेही (Nora Fatehi ) आता कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर तिने स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे.

नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नोरा फतेही 28 डिसेंबर रोजी झालेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आली आहे. नोरा कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळत आहे आणि या अंतर्गत तिने डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वतःला क्वारंटाईन केले आहे. सुरक्षा आणि सतर्कतेच्या दृष्टीने नियमानुसार, ती BMC ला पूर्ण सहकार्य करत आहेत.’

ते फोटो आधीचे!

प्रवक्त्याने आपल्या विधानात असेही स्पष्ट केले की, नोरा फतेहीचे जे फोटो सोशल मीडियावर 28 डिसेंबरचे असल्याचे सांगून व्हायरल होत आहेत, ते प्रत्यक्षात पूर्वीच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ‘अलीकडे नोरा कुठेही घराबाहेर पडलेली नाही. अशा परिस्थितीत या फोटोंकडे दुर्लक्ष करावे, अशी विनंती आहे.’

नोराने दिली माहिती

नोरा फतेहीने स्वतःची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि लिहिले की, ‘कोव्हिडचा माझ्यावर वाईट परिणाम झाला आहे. मी गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या सूचनेनुसार बेडवरच पडून आहे. तसेच सुरक्षित रहा आणि मास्क घाला. कोव्हिडचा प्रसार झपाट्याने होत आहे आणि लोकांना त्याचा वेगवेगळ्या प्रकारे त्रास होऊ शकतो.’

पाहा नोराची पोस्ट :

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.