परिणीती चोप्राच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! ‘सायना’ लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्यात दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत दिसली होती.

परिणीती चोप्राच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! 'सायना' लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार
सायना चित्रपट
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 12:45 PM

मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्यात दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट गेल्या महिन्यात सिनेमाघरात प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी येत आहे. हा चित्रपट सिनेमाघरात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. ( Parineeti Chopra’s film ‘Saina’ will be released on Amazon Prime Video on April 23)

23 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर या चित्रपटच प्रदर्शित होणार आहे. परिणीती चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे खूपच खूष आहे. यावर परिणीती म्हणाली आहे की, ‘चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे मी खूप उत्साही आहे. आता जगभरातील लोक ही कथा बघू शकणार आहे. बायोपिक चित्रपटांमध्ये काम करणे एक मोठे आव्हान असते हे मला समजले आहे आणि या चित्रपटात माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सायनाचे पात्र साकारणे होते.

चित्रपटाची कथा 

सायनाच्या आईची इच्छा असते की, सायना खूप मोठी बॅडमिंटनपटू व्हावी. सायनासुद्धा आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. पुढे जाऊन हे स्वप्न केवळ तिच्या आईचेच नाहीतर सायनाचेही होते. सायनाला आपल्या देशाकडून खेळायचे असते. यासाठी ती खूप कष्ट करते आणि त्यादरम्यान, तिच्या आयुष्यात बर्‍याच अडचणी येतात. यावर हा सर्व चित्रपटा आधारित आहे. यादरम्यान सायना कशापध्दतीने कष्ट घेते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

सायना चित्रपट तामिळ रॉकर्स, मूव्हीरूल्स, टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लीक झाला होता. मात्र असे होऊनही सिनेमाघरात चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. अलीकडेच परिणीती चोप्राने बॉडी शेमिंगवर भाष्य केले आणि म्हणाली की, करिअरच्या सुरूवातीस वाढलेल्या वजनामुळे तिला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. ‘बॉडी शेमिंग ही पृथ्वीवरील सर्वात हास्यास्पद आहे. प्रत्येकाने तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण पातळ होण्याचा प्रयत्न करू नये, असे परिणीती म्हणाली होती.

परिणीतीच्या अगोदर सायना चित्रपटात श्रद्धा कपूर भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. यानंतर परिणीती चोप्राला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले.परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, या चित्रपटात परिणीती गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये परिणीती विदेशात भटकताना दिसली होती. द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटाचा टीझर परिणीतीने सोशल मिडियावर शेअर केले होते.

संबंधित बातम्या : 

Inspiring Love Stories | 15 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नावर जडले डिंपल कपाडियांचे प्रेम, अनेक संकटांवर मात करत अमर झाली प्रेमकथा!

तो कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेला आणि हार्ट अटॅक आला, साऊथ स्टार विवेकची चटका लावणारी एक्झिट

(Parineeti Chopra’s film ‘Saina’ will be released on Amazon Prime Video on April 23)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.