पायल रोहतगीच्या वकिलाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर नाकारला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) काही ना काही कारणांमुळे वादात सापडते. पायल तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) काही ना काही कारणांमुळे वादात सापडते. पायल तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता अभिनेत्रीच्या वकिलांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
अभिनेत्रीवर आता असा आरोप करण्यात आला आहे की, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिने देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. पण आता अभिनेत्रीच्या वकिलाने या प्रकरणाला नवा वळण दिले आहे.
जाणून घ्या अभिनेत्रीच्या वकिलाचे म्हणणे काय?
आता झूमच्या बातमीनुसार पायल रोहतगीच्या वकिलांनी म्हटले आहे की, माध्यमांमध्ये माझी क्लायंट पायल रोहतगी बद्दल अहवाल आहेत, परंतु या प्रकरणात आम्हाला एफआयआरशी संबंधित कोणतीही माहिती किंवा नोटीस मिळालेली नाही. ते म्हणतात की, हा 2019चा व्हिडीओ असू शकतो आणि बूंदीच्या (राजस्थान) कोर्टात आधीच एक केस चालू आहे, ती ट्रायलच्या टप्प्यात आहे.
त्यांनी असेही सांगितले की, त्याच्या क्लायंटचे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट गेल्या एका वर्षात निष्क्रिय आहेत. त्या शेवटच्या व्हिडीओपासून आत्तापर्यंत त्यांनी कोणताही वादग्रस्त व्हिडीओ बनवलेला नाही किंवा कोणताही व्हिडीओ पोस्ट केलेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्रीविरोधात कलम 153 (A), 500, IPC 505 (2) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीवर सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह शब्द वापरले गेले आहेत.
अभिनेत्री विरुद्ध पोलिसांना मिळालेल्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, अभिनेत्री पायल रोहतगीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अपमानास्पद व्हिडीओ बनवला आहे.
एवढेच नाही, तर अभिनेत्रीने हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रसारित केला आहे. असेही म्हटले गेले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो.
पायल रोहतगी गांधी कुटुंबाविरोधात काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2019 मध्ये राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पायलवर गुन्हा दाखल केला होता.
कोण आहे पायल रोहतगी?
अभिनेत्री पायल रोहतगीने 2002मध्ये रिलीज झालेल्या ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर, ती 2006 मध्ये ‘36 चायना टाऊन’मध्येही दिसली. चाहत्यांनी पायलला बिग बॉसमध्येही पाहिले आहे.
हेही वाचा :
‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांचा जल्लोष, ‘गणशोत्सव 2021’मध्ये पारंपरिक पद्धतीने होणार गणरायाचं स्वागत
‘मनी हाईस्ट 5’ ते ‘मुंबई डायरीज 26/11’, सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाची मोठी मेजवानी!