Malaika Arora | सेल्फी काढण्यासाठी मलायका अरोराच्या भोवती लोकांनी केली गर्दी आणि पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक, चाहत्यांचा संताप
मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो हे शेअर केले होते. नेहमीच मलायका अरोरा ही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. कायमच जिमच्या बाहेर मलायका अरोरा (Malaika Arora) ही स्पाॅट होते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही तिच्या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायका अरोरा ही अत्यंत मोठे खुलासे करताना कायमच दिसते. मलायका अरोरा हिच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक स्टारने उपस्थिती लावलीये. काही दिवसांपूर्वी करण जोहर हा मलायका अरोरा हिच्या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये करण जोहर हाच मलायका अरोरा हिला अनेक प्रश्न विचारताना दिसला. इतकेच नाही तर चक्क करण जोहर (Karan Johar) याने मलायका अरोरा हिला तिच्या सेक्स लाईफबद्दलही प्रश्न विचारून टाकला.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मलायका अरोरा हिने अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर तिने बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केलीये. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही अर्जून कपूर यालाच डेट करत आहे. कायमच मलायका अरोरा ही तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.
नुकताच सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ दुबईमधील असून एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. पहिल्यांदा काही लोक मलायका अरोरा हिच्याजवळ येतात आणि सेल्फी घेतात.
View this post on Instagram
काही वेळामध्येच मलायका अरोरा हिच्या भोवतालची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. मलायका अरोरा हिच्याजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांना देखील गर्दी नियंत्रणात करताना नाकीनऊ येतात. यावेळी मलायका अरोरा ही त्रस्त झाल्याचे दिसत असून लोक तिच्या एकदम जवळ येऊन सेल्फी घेतात. शेवटी सुरक्षारक्षक तिच्याजवळ असलेल्या लोकांना दूर करतात.
या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा काही वेळासाठी घाबरलेली देखील दिसत आहे. आता मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. एकाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, अरे थोडे लांबून फोटो काढा, मलायका अरोरा ही घाबरत आहे. दुसऱ्याने लिहिले की, हा काय नेमका मुर्खपणा सुरू आहे.