पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबतचा हृतिक रोशन याचा ‘तो’ फोटो व्हायरल
आता हृतिक रोशन हा त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आलाय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सबा आझाद हिच्यासोबत हृतिक रिलेशनमध्ये असून दोघे कायमचसोबत स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन, सबा आझाद आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड हाॅटेल बाहेर स्पाॅट झाले होते. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि यावरून अनेकजण हे सबाला ट्रोल देखील करत होते. आता हृतिक रोशन हा त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आलाय.
हृतिक रोशन याने सौदी अरेबियामध्ये रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये हजेरी लावलीये. फक्त हृतिकच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखील रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये हजेरी लावली आहे.
हृतिक रोशन याचा रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
View this post on Instagram
हृतिकच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दिसत असून दोघे एकमेकांकडे बघत असून हे सोबतच बसले आहेत. हाच फोटो आता तूफान व्हायरल होतोय.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये हृतिक रोशन याचा लूक जबरदस्त दिसत आहे. माहिरा खान हिने 2017 मध्ये शाहरुख खानच्या रईस या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका केली होती. आता या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये.