Prabhas | आदिपुरुष चित्रपटाचे शूटिंग थांबवले, प्रभास हॉस्पिटलमध्ये दाखल, वाचा काय घडले?
आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरच प्रभास आणि क्रिती यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याचे सांगितले जातंय. इतके नाही तर हे दोघे लवकरच लग्नबंधणात अडकणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यात प्रभास आणि क्रिती सनॉन हे साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजूनही क्रिती किंवा प्रभास यांनी आपल्या नात्याबद्दल काहीच भाष्य केले नाहीये. आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाच्या सेटवरच प्रभास आणि क्रिती यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याचे सांगितले जातंय. इतके नाही तर हे दोघे लवकरच लग्नबंधणात अडकणार असल्याची चर्चा आहे. चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. क्रिती सनॉन आणि प्रभासच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आदिपुरुषच्या सेटवरून एक मोठी बातमी पुढे येतंय. रिपोर्टनुसार प्रभासची तब्येत खराब झालीये. यामुळे आदिपुरुष या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच थांबवण्यात आले असून पुढील काही दिवस प्रभासला आराम करण्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आलायं.
ओम राऊत याच्या दिग्दर्शनाखाली आदिपुरुष हा चित्रपट तयार होतोय. चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच प्रभासची तब्येत खराब झालीये. यामुळे चित्रपटाचे शूटिंग हे अर्ध्यामध्येच थांबवण्याची वेळ आली.
रिपोर्टनुसार प्रभासची तब्येत अचानकच खराब झाली. सर्दी, ताप असल्याने प्रभासला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डाॅक्टरांनी प्रभासला एडमिट करत काही दिवस पूर्णपणे विश्रांती करण्याचा सल्ला दिलाय.
प्रभासची तब्येत खराब झाल्याने आता आदिपुरुष चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांसाठी थांबण्यात येईल. आदिपुरुष हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
असे सांगितले जात आहे की, तब्येत पूर्णपणे बरी झाल्यानंतर प्रभास पुन्हा आदिपुरुष चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभासच्या आगामी चित्रपटाची वाट पाहात आहेत.
प्रभासच्या बाहुबली या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रेम दिले. बाहुबली या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. बाहुबली हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला.
पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. मात्र, अजून बाहुबली चित्रपटाचा रेकाॅर्ड तोडण्यात पठाण चित्रपटाला यश मिळाले नाहीये. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते.
पठाण या चित्रपटाला जगभरातून मोठे प्रेम मिळत आहे. हिंदी भाषेमध्येही चित्रपटाने आतापर्यंत चांगली कामगिरी नक्कीच केलीये. मात्र, पठाण चित्रपटाची जादू साऊथच्या प्रेक्षकांवर चालली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. साऊथमध्ये चित्रपट धमाकेदार कामगिरी करेल असे अनेकांनी वाटले होते. परंतू प्रत्यक्षात साऊथमध्ये पठाण चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.