Happy Birthday Lata Mangeshkar | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकरांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!, ट्वीट करत म्हणाले…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी खास ट्विट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Lata Mangeshkar | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकरांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!, ट्वीट करत म्हणाले...
Lata Mangeshkar
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:30 AM

मुंबई : जगभरात आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज वाढदिवस आहे. आज त्या 92 वर्षांच्या झाल्या आहेत. लता दीदी, त्यांचे चाहते आणि बॉलिवूडसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी खास ट्विट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकरांसाठी ट्विट केले आणि लिहिले की, ‘आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा मधुर आवाज संपूर्ण जगात गाजतो. त्यांच्या नम्रतेबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दलच्या उत्कटतेबद्दल सर्वत्र त्यांचा आदर केला जातो. वैयक्तिकरित्या, त्यांचे आशीर्वाद महान शक्तीचा स्रोत आहेत. मी लता दीदींना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.’

पंतप्रधान मोदींचे ट्विट :

हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला होता. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यात संगीत क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत. त्यांना गायन क्षेत्रात अनेक सन्मानही मिळाले आहेत. गायन क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

एका गाण्यासाठी तासन् तास मेहनत!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) हे एक असं नाव आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. संगीताच्या जगात हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ‘भारतरत्न’ लता मंगेशकरांच्या आवाजात जादू आहे. त्यांच्याकडे दैवी प्रतिभा आहे, वगैरे असं आपण बऱ्याचदा ऐकतो, पण या सगळ्यात त्यांचा संघर्ष फार कमी अधोरेखित केला जातो.

लता मंगेशकर यांनी अशा वेळी गायला सुरुवात केली, जेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. म्युझिक रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगसाठी इतकी प्रगत उपकरणे नव्हती. ‘महल’ मधील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने लता मंगेशकर यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. फार कमी लोकांना माहिती आहे की या गाण्यातील आवाजाचा चढउतार कोणत्याही तंत्राच्या मदतीने तयार केला गेला नाही, तर तो एका विशेष प्रकारे रेकॉर्ड केला गेला. जर, तुम्हाला ते गाणे आठवत असेल, जेव्हा अशोक कुमार आरशासमोर उभे राहतात आणि गाणे सुरू होते, तेव्हा दुरून आवाज येऊ लागतो आणि नंतर तीन-चार ओळी नंतर ते जवळून आल्यासारखे वाटते. या प्रकारचा ध्वनी प्रभाव तंत्राच्या मदतीने तयार केला जाऊ शकतो, परंतु त्या वेळी गायकाला हे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती..

हेही वाचा :

Happy Birthday Ranbir Kapoor | आलिया भट्टच नाही तर आधीही अनेक वेळा प्रेमात पडलाय रणबीर कपूर, ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!

Happy Birthday Lata Mangeshkar | ‘लग जा गले’ ते ‘अजीब दास्तान’पर्यंत, ऐका लता मंगेशकर यांची सुरेल गाणी!

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.