खेळ कुणाला दैवाचा कळला! मृत्युच्या अवघ्या 24 तास आधी पुनीतचा यशसोबत डान्स परफाॅर्मन्स!

आता पुनीतचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. मृत्यूच्या 24 तासांपूर्वी एक सुपर डान्स परफाॅर्मन्स देतानाचा हा व्हिडीओ आहे. (Puneet's successful dance performance just 24 hours before his death!)

खेळ कुणाला दैवाचा कळला! मृत्युच्या अवघ्या 24 तास आधी पुनीतचा यशसोबत डान्स परफाॅर्मन्स!
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 6:52 PM

मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने 29 ऑक्टोबर रोजी या जगाचा अचानक निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पुनीत अवघ्या 46 वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. फिटनेस फ्रिक असलेल्या पुनीतने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. पुनीतची तब्येत बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तसे होऊ शकले नाही.

मात्र आता पुनीतचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. मृत्यूच्या 24 तासांपूर्वी एक सुपर डान्स करतानाचा हा व्हिडीओ चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. या व्हिडीओ पुनीत यशसोबत डान्स करताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ

तसेच पुनीतच्या अंत्यविधीसाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या लाडक्या कलाकाराला अखेरचा निरोप देताना चाहते प्रचंड भावूक झाले होतो.

पाहा व्हिडीओ

अभिनेत्याने आपल्या वडिलांप्रमाणेच डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांनी स्वतः 1994 मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डॉ. राजकुमार यांचाही 2006 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पुनीतच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने नेत्रदानासाठी ऑपरेशन केल्याचे अभिनेता चेतन कुमार यांनी ट्विट करत सांगितले.

सहा तासांच्या आत पार पडले नेत्रदान

अभिनेत्याने लिहिले की, ‘मी जेव्हा अप्पू सरांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डॉक्टरांचा एक गट त्यांचा नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आला होता. राजकुमार आणि निम्माशिवा या डॉक्टरांप्रमाणे अप्पू सरांनीही नेत्रदान केले.’ यासोबतच अभिनेत्याने हे उदाहरण म्हणून घेत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नेत्रदान करण्याचे आवाहन केले.

पुनीतची ओळख

पुनीत केवळ अभिनेताच नव्हता तर गायकही होता. त्यांचा जन्म 17 मार्च 1975 रोजी झाला. त्याने 2002 मध्ये ‘अप्पू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी 29हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

पुनीत हे दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध नाव होते. पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ते कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे कन्नड इंडस्ट्रीतील ते पहिले अभिनेता होते. लहानपणापासूनच पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी पुनीत एक होते.

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte | वाऱ्यावर भुरभुरणारे केस, गोड स्मित, ‘आई कुठे काय करते’मधील ‘आई’चा ग्लॅमरास लूक पाहिलात का?

Aryan Khan Release | ‘दिवाळीत खानांचे सिनेमे रिलीज होतात, या दिवाळीत खान स्वतः रिलीज झाले!’, आर्यनच्या सुटकेनंतर राम गोपाल वर्मांचे मिष्किल ट्वीट!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.