Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाची चमकदार कामगिरी; भारतासाठी जिंकलं रौप्यपदक

अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने जलतरण स्पर्धेत कर्तृत्व गाजवलं आहे. वेदांतने नुकतंच डॅनिश ओपन 2022 स्पर्धेत (Danish Open swimming) रौप्य पदक पटकावलं आहे.

Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाची चमकदार कामगिरी; भारतासाठी जिंकलं रौप्यपदक
R Madhavan with son Vedaant Madhavan Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:11 AM

अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने जलतरण स्पर्धेत कर्तृत्व गाजवलं आहे. वेदांतने नुकतंच डॅनिश ओपन 2022 स्पर्धेत (Danish Open swimming) रौप्य पदक पटकावलं आहे. त्याने 1500 मीटर फ्री-स्टाइल जलतरण स्पर्धेत पदक जिंकलं असून आर माधवनने भारतीय जलतरण महासंघाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत या स्पर्धेतील भारताच्या विजयाबद्दलची माहिती दिली. वेदांतने याआधीही स्विमिंगमधील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. मुलाच्या विजयाबद्दलची माहिती देताना माधवनने लिहिलं, ‘तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने वेदांतने कोपनहेगन इथल्या डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकलंय. प्रशिक्षक प्रदीप सर, SFI आणि ANSA तुमचे खूप खूप आभार. आम्हाला खूप अभिमान आहे.’ माधवनच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रौप्य पदकासाठी वेदांतच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं पहायला मिळतंय. स्पर्धेत फ्रेडरिक लिंडहोमने कांस्यपदक जिंकलं, तर अॅलेक्झांडर एल ब्योर्नने सुवर्णपदक जिंकलं. माधवनच्या या पोस्टवर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सुपर शुभेच्छा’, असं अभिनेत्री ईशा देओलनं लिहिलं. तर नम्रता शिरोडकर आणि दर्शन कुमारने टाळ्या वाजवतानाचा इमोजी पोस्ट केला. ‘भविष्यात आणखी पदकं जिंकून येशील याची खात्री आहे’, असं लिहित रोहित बोसने वेदांतला शुभेच्छा दिल्या. ‘वेदांत तुझा खूप अभिमान वाटतो’, असं दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी लिहिलं. शिल्पा शेट्टी, शिल्पा शिरोडकर यांनीसुद्धा कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला.

आर. माधवनने शेअर केलेली पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

वेदांतला लहानपणापासूनच पोहण्याची आवड आहे. याच आवडीमुळे शाळेत असताना त्याने जलतरण संघात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या संघातून तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. वेदांतने याआधी विविध स्पर्धांमध्ये 4 रौप्य आणि 3 कांस्यपदक जिंकले आहेत.

हेही वाचा:

Sanjay Dutt: “पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो”; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव

Hruta Durgule: हृता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी बांधणार प्रतीक शाहशी लग्नगाठ

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.