Raj Kundra Case : पूनम पांडे, सागरिका शोनानंतर आता ‘या’ मॉडेलचे गंभीर आरोप, म्हणाली, न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती

निकिता फ्लोरा सिंहनं आपल्या एका ट्विटद्वारे हे आरोप केले आहेत. निकितानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे - नोव्हेंबर 2020 मध्ये मला उमेश कामत यांनी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड शूटबद्दलही विचारलं होतं, मात्र मी नकार दिला. (Raj Kundra Case : After Poonam Pandey and Sagarika shona now serious allegations of this model, said, there was a big offer for nude photoshoot)

Raj Kundra Case : पूनम पांडे, सागरिका शोनानंतर आता 'या' मॉडेलचे गंभीर आरोप, म्हणाली, न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:02 AM

मुंबई : राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याशी संबंधित अश्लील प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. पूनम पांडे (Poonam Pandey) आणि सागरिका शोनासारख्या (Sagarika Shona) मॉडेल्सनी राज कुंद्रावर यापूर्वीही गंभीर आरोप केले आहेत. आता या यादीत आणखी एका मॉडेलचं नाव जोडलं गेलं आहे, असा दावा आहे की तिला राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपवर न्यूड शूटसाठी दर दिवसाला 25,000 रुपयांची ऑफर देण्यात आली होती. निकिता फ्लोरा सिंह असं या मॉडेलचं नाव आहे. राज कुंद्रा यांचे वैयक्तिक सहाय्यक उमेश कामत यांनी ही ऑफर केल्याचा आरोप निकितानं केला आहे.

निकिता फ्लोरा सिंहनं आपल्या एका ट्विटद्वारे हे आरोप केले आहेत. निकितानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे – नोव्हेंबर 2020 मध्ये मला उमेश कामत यांनी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड शूटबद्दलही विचारलं होतं, मात्र मी नकार दिला. कामतनं मला यासाठी दर दिवसाला 25,000 रुपये ऑफर केले होते. देवाचे आभार मानते की मी कुंद्रासारख्या मोठ्या नावात पडले नाही.

वाचा निकिता फ्लोरा सिंहचे ट्विट

यासोबतच निकितानं हे देखील उघड केलं की झारखंडमधील एका महिलेनं केवळ हॉटशॉट्ससाठी शूट केल्यामुळे तिचा घटस्फोट झाला आहे. निकिता लिहिलं – झारखंडमधील एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिला होता कारण तिनं हॉटशॉट्ससाठी शूट केलं होतं.

निकितापूर्वी या मॉडेल्सने केले आरोप

राज कुंद्रा अश्लीलता प्रकरण उघड झाल्यानंतर एकामागून एक मॉडेल, हॉटशॉट्सवर गंभीर आरोप करत आहे. निकिताच्या आधी सागरिका शोना सुमन आणि पूनम पांडे यांनी राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीवर न्यूड शूट करण्याची विचारणा केल्याचा आरोप केला होता. एकीकडे पूनम पांडेनं असा दावा केला होता की तिचा राज कुंद्रा कंपनीबरोबर करार संपला तेव्हा त्याच्या कंपनीतील लोकांनी तिला जिवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही तर पूनम पांडेनं तिचा वैयक्तिक नंबर राज कुंद्राच्या कंपनीने लीक केल्याचा आरोप केला होता.

दुसरीकडे, सागरिकानं पत्रकार परिषदेत राज कुंद्रावर फेब्रुवारीमध्ये गंभीर आरोप केले होते. राज कुंद्राच्या अटकेनंतर बी सागरिका हॉटशॉट्स अ‍ॅपबद्दल उघडपणे बोलली. यानंतर सागरिकानं असा दावा केला होता की राज कुंद्रा विरोधात बोलल्यानंतर तिला मृत्यू आणि बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. याबाबत सागरिकाने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सध्या राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती, त्यानंतर 23 जुलैपर्यंत त्याला रिमांडवर पाठवण्यात आलं होतं. पोलिसांनी राज कुंद्राला पुन्हा 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यानंतर कोर्टाने त्याचा रिमांड 27  जुलैपर्यंत वाढवला आहे. राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यात पोलिस गुंतले आहेत, हे न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालय याप्रकरणी निर्णय देईल.

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘बबिता’ने मालिका सोडली ही केवळ अफवाच! ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

Khoya Khoya Chand | फिल्म इंडस्ट्रीचा निरोप घेऊन राजकारणात प्रवेश, आता कर्करोगाशी झुंज देतेय अभिनेत्री किरण खेर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.